माजलगाव प्रतिनिधी: मुस्ताक कुरेशी
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने नगर परिषद माजलगाव या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले होते या आंदोलनामध्ये अनेक मागण्या होत्या ते मागण्या माजलगाव शहरातील नागरिकांच्या समस्या बाबत आंदोलन करण्यात आले होते.
नवीन व जुने कब्रस्तान रोडवरील पावसाचे पाणी व नाल्याचे पाणी भर रस्त्यावर येत असल्याने त्या प्रशासनाने वेळीच दखल घेऊन रस्ता करण्यात यावे असे अंदोलनकर्त्याचे म्हणने होते तसेच रस्त्यावर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे जे आहेत ते उचलण्यात यावी व नवीन व जुने कब्रस्तान मधील पथदिवे दुरुस्ती करून द्यावे तसेच माजलगाव शहरात जंतुनाशक फवारणी व दूर करणे धूर फवारणी करण्यात यावी अश्या विविध समस्या बाबत आंदोलन करण्यात आले होते. त्या आंदोलनाची दखल नगर परिषद प्रशासनाने दखल घेऊन आंदोलन कर्त्यास पाच दिवसात काम करून देऊ असे लेखी आश्वासन दिले होते ते आश्वासन नगरपरिषद प्रशासनाने पुर्ण केले. ज्या मागण्या, ज्या समस्या होत्या त्या समस्याचां निवारण करून मागण्या पूर्ण केल्यामुळे समितीच्या उपोषणाला यश आले व नागरिकांना सुविधा मिळाली अडचणी दूर झाल्या.
या समस्या दूर करण्यासाठी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे माजलगाव तालुकाध्यक्ष मुस्ताक कुरेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आरेफ खान, मोसीन बागवान, मानवी हक्क अभियानचे अशोक ढगे, अलिशेर, आजम कूरेशी, प्रहारचे गोपाळ पैंजने, नितिन कांबळे, लोकदशाचे नाजेर भाई, सादेक पठाण, संभाजी बिग्रेडचे मोजम कूरेशी व शहरातील अनेक नागरीकयांनी वेळोवेळी तक्रारी दिली व उपोषणे आंदोलने केली या उपोषणकर्त्यांचा गावातील नागरिकांनी मानले आभार.