प्रतिवीर पत्रकार कर्मचारी सहकारी पतसंस्थेची घटस्थापनेच्या मुहूर्तावर स्थापना
सोलापूर (प्रतिनिधी) : येथील दैनिक प्रतिविर या वृत्तपत्राच्या पत्रकार व कर्मचारी यांच्यासाठी प्रतिवीर पत्रकार व कर्मचारी सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली असून या संस्थेच्या अध्यक्षपदी संपादक चंद्रशेखर लालप्पा गायकवाड यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे. तसेच सचिव म्हणून मारुती दत्तात्रय गवळी तर ज्येष्ठ संचालक म्हणून प्रदीप देविदासराव कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. याचबरोबर विलास चांगदेव मस्के, गजानन संजय जोशी, संदीप विठ्ठल विदुर, अनंत उत्तमराव साखरे, धनंजय देविदास घोगरे, दत्तात्रय गणपतराव परळकर यांची संचालक म्हणून कार्यकारिणीत निवड करण्यात आली आहे.*