शिरूरअनंतपाळ प्रतिनिधी: फतेहअलीखान पठाण
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे तर्फे फेब्रुवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शिरुर अनंतपाळ तालुक्यातील कानेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आठवीचा विद्यार्थी कृष्णा वसंत सुरवसे हा पात्र झाला आहे.शाळेच्या इतिहासात प्रथमच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत हे यश प्राप्त झाले आहे.शाळेच्या वतीने कृष्णाचा घरी जाऊन सत्कार करण्यात आला.यावेळी कृष्णाला विनायक सुरवसे व सुशीलकुमार पांचाळ यांनी प्रत्येकी पाचशे रुपयाचे बक्षीस दिले.यावेळी प्रशांत जाधव,गोपाळ सोलंकर,वसंत सुरवसे यांची उपस्थिती होती.जिल्ह्यातील पहिली तंबाखूमुक्त शाळा,तालुक्यातील पहिली शाळाबाह्य विद्यार्थी नसलेली शाळा,राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी शाळा,राज्यस्तरीय नवोपक्रम व कृती संशोधन स्पर्धेत सहभाग घेऊन यश मिळविणारी शाळा तसेच अशा कोरोना परिस्थितीतही ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण देणारी शालेय व सहशालेय उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणारी शाळा म्हणून कानेगावच्या जिल्हा परिषद शाळेचा नावलौकिक आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेतील यशामुळे एक गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून ओळख निर्माण झाली आहे.वर्षभर जादा तासिका घेऊन सराव घेतल्याचे मुख्याध्यापक सुरेश बिरादार यांनी सांगितले.शाळेच्या या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे कृषी सभापती गोविंद चिलकुरे,पंचायत समितीचे सभापती नरेश चलमले, डायटचे प्राचार्य अनिल मुरकुटे,माध्यमिक शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ वैशाली जामदार,गटविकासाधिकारी नंदकुमार शेरखाने, गटशिक्षणाधिकारी अनिल पागे,गटसमन्वयक व केंद्रप्रमुख शिवाजी एरंडे,गटसाधन केंद्राचे विषय साधनव्यक्ती,कानेगाव ग्रामपंचायत कार्यालय,शाळा व्यवस्थापन समिती,पालक व ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.