सगीर मोमिन: वलांडी प्रतिनीधी
वलांडी तलाठी सध्याचे मंडळ अधिकारी शिवाजी हेळंबे यांचा प्रदीर्घ सेवेनंतर सेवा निवृत्त झाल्यामुळे वलांडी ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
श्री शिवाजी हेळंबे यांनी कोरोना काळात वलांडी येथील मंडळ अधिकारी म्हणून तत्पर सेवा बजावली आहे . त्यांच्या कार्यकाळात वलांडी परिसरातील शेतकऱ्यांचे प्रलंबित अनेक प्रश्न मार्गी लागली आहेत.थोडक्याच कालावधीत त्यांनी एक कार्यतत्पर अधिकारी म्हणून जनसमान्यच्या मनात आपली जागा निर्माण केली होती . अनेक शासकीय अधिकारी मुख्यालयी राहण्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असताना त्यांनी स्वतः वलांडी येथील मुख्यालयी राहून एक आदर्श निर्माण केला त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी वलांडी चे माजी सरपंच श्री रामभाऊ भंडारे, आयुब सौदागर, बालाजी भोसले, श्री तानाजी पाटील, मुश्ताक कादरी, संगमेश्वर स्वामी, व अनेक शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.