लातूर प्रतिनिधी: अहेमद तांबोळी
लातूर कासार सिरसी ते बसवकल्याण या मार्गावरील पुरात वाहून जाणाऱ्या दोघांचे प्राण वाचविले पोलिस धुमाळ यांनी बुधवारी दिवसभर चालू असलेल्या पावसात ओढ्यांमध्ये पाणी गच भरून जात होते व रस्ते पूर्णपणे बंद होते पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे पोलीस बंदोबस्त लावला होता याठिकाणी पोलीस धुमाळ आपले कर्तव्य बजावत होते त्यावेळेस दोघेजण टमटमने प्रवास करत होते टमटम पुढे जात नाही हे लक्षात घेता पाण्यातून पायी प्रवास करताना पाण्यामध्ये उतरले व पुढे चालायला लागले मात्र पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे दोघेही वाहून जाऊ लागले यावेळी पोलीस धुमाळ यांनी कसलाही विचार केला नाही व पाण्यात उडी मारली पंधरा ते वीस फूट वाहत्या पाण्यात जाऊन दोघांनाही धरून पाण्याच्या बाहेर आणले व दोघांचेही प्राण वाचविले कासार शिरशी पोलीस ठाण्यातील पोलिस नाईक पदावर कार्यरत असलेले श्री एम एस धुमाळ यांनी आपला जीव धोक्यात घालून नेलवाड येथे पुरात वाहून जात असलेल्या दोघांचे प्राण वाचविले याबद्दल संपूर्ण गाव त्यांचे कौतुक करत आहे व लातूर_पोलीस दलातील पोलीस नाईक धुमाळ यांनी प्रसंगावधान राखून पुराच्या पाण्यात वाहून जात असलेल्या दोघांचे प्राण वाचवल्याबद्दल
या कामगिरी बद्दल पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी अभिनंदन केले.