अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समीतीच्या पदाधिकाऱ्यांचे जनतेने मानले आभार
परंडा दि २८ ( प्रतिनिधी ) शहरातील पन्नास वर्षापुर्वीचे विद्युत खांब खालच्या बाजुने पुर्णता गंजून कुजले गेले असुन हे विद्युत खांब कधी ही कोसळुन मोठी दुर्घघटणा होण्याची शक्यता असुन असे विद्युत खांब महावितरण कंपणीने बदलावे आशी मागणी एक वर्षापुर्वी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समीतीच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती . याचा पाठपुरावा सुरु ठेवला अखेर या पाठपुराव्याची दखल महावितरण कंपणीने घेतली आणि कुजलेले विद्युत खांब बदलण्यास सुरुवात केली आहे .
शहरातील धोकादायक कुजलेले विद्युत खांब महावितरणने बदलण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे जनतेतुन अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समीतीचे आभार मानले तर महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या या कामाबद्दल नागरीकातुन समाधान व्यक्त होत आहे
शहरात गेल्या अनेक वर्षापुर्वाची जुनी विधुत खांब खालच्या बाजुने गंजुन कुजली गेली आहेत हे खांब सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कोणत्याही शणी कोसळून मोठी दुर्घटना घडून जिवीत हानी घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समीतीचे मराठवाडा सचिव फारूक शेख , जिल्हाध्यक्ष
एकबाल शेख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्याकडे १० स्पटेंबर २०१९ रोजी निवेदन दिले . संबंधित अधिकाऱ्यांनी शहरातील धोकादायक पोलचा सर्वे करण्यासाठी लाईनमनला सांगितले लाईनमने सर्वे करून अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला मात्र महावितरणकडुन कुजलेले पोल बदलण्यासाठी काही हालचाली दिसत नसल्याने पुन्हा समितीने दुसरे निवेदन दिले त्यानंतर संमधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी अधिकाऱ्यानी सांगीतले आम्ही रिर्पोट वरिष्टांकडे पाठवले आहे . याला मंजुरी मिळाली की पोल बदलण्यात येईल असे सांगीतले होते .निवेदन देऊन १० महिने झाले तरी पोल बदलण्याच्या मागणीला महावितरण दुर्लक्ष करीत असल्याचा समज अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समीतीच्या पदाधिकाऱ्यांचा झाला त्यानी दिलेल्या निवेदनावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कोणत्या स्वरुपाची कार्यवाही केली . व ते कोणत्या अधिकाऱ्यानी केली याची माहिती माहितीच्या अधिकारात मागीतली असता संबधित अधिकाऱ्यांनी कुजलेले विद्युत खांब बदलण्याच्या कामास सुरुवात केली आहे .