गेवराई प्रतिनिधी- शेख जुनेद,
गेवराई तालुक्यातील नंदपूर गावातील शेख शकील हे आरोग्य विभागातील आरोग्य सेवक या पदात भरती झाले. शेख शकील यांचे आरोग्य सेवक पदास भरती झाल्यास त्यांच्या परिवारातील लोकांना आनंद मावेनासा आसा झाला.शकील च्या घरची परिस्थिती गरिबीची आहे. त्यांचे आई वडील मोलमजुरी करतात. त्याचे वडील कारखान्याला सुद्धा जातात.घरची परिस्थिती पाहून शेख शकील लहानपणापासूनच नोकरीसाठी धडपडत होता. लहानपणापासूनच मला काही ना काही बनायचेच अस शकील च धैय्य होत. आणि ते धैय्य आज पूर्ण झाल. शकील ला नोकरी लागल्यामुळे गावात रॅली काढून शकील चा सत्कार करण्यात आला. आणि गावातील उच्चशिक्षित विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन सुद्धा केले. शेख मोहम्मद भाई यांनी शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमचं ध्येय ठेवा आणि ते ध्येय मी मिळवणारच अशी तुमची आपेशा ठेवा . धेय्याच्या मागे लागत रहा.तुम्हाला सुद्धा तुमचं धेय्य मिळुण जाईल असे त्यांनी यावेळी सांगीतले.