देवनी खुर्द येथील माजी पोलीस पाटील व सामाजिक कार्यकर्ते श्री तुकाराम भद्राजी देवणीकर ( पाटील )व त्यांच्या पत्नी सुजाता तुकाराम देवणीकर यांचा लग्नाचा 42 वा वाढदिवस कोरोणाच्या महामारी मुळे केक न कापता त्यांनी देवणी येथील राहत्या घरी वृक्षारोपण करून आपला वाढदिवस उत्साहात साजरा केला .यावेळी शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन केले त्यांनी आपल्या वाढदिवसा प्रसंगी म्हणाले की वृक्षांमुळेच आपल्याला ऑक्सिजन मिळते वृक्षांची जोपासना करणे ही आजच्या काळाची गरज आहे .
वृक्षामुळे जल, हवा , ऑक्सिजन मिळते असे हि म्हणाले त्यामुळे वृक्षाची संगोपन करणे हीच काळाची गरज आहे याचे अनुकरण नागरिकांनी केले पाहिजे असे विचार त्यांनी सांगितले .