वलांडी प्रतिनिधी: सगीर मोमीन
देवणी तालुक्यातील वलांडी येथे माजी खासदार, आदरणीय श्रीमती रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त अक्का फाऊंडेशनच्या वतीने आपल्या उदरनिर्वाहासाठी रस्त्याच्या कडेला बसून व्यवसाय करणारे, भाजीपाला, फळ विक्रेते, चर्मकार व्यवसाय करणारे, पान-तंबाखू विक्रेते इत्यादी व्यवसायिकांना ऊन-पावसापासून संरक्षणासाठी छत्री वाटप करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष श्री.काशिनाथजी गरिबे, जि.प.सदस्य श्री.प्रशांतजी पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री.तुकारामजी पाटील, सभापती श्री.बालाजी बिरादार जी, श्री.सुधीरजी भोसले, अक्का फांऊडेशन समन्वयक श्री.रामलिंगजी शेरे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष श्री.बालाजी बिरादार जी, श्री.संगमजी पताळे, भाजयुमो तालुका उपाध्यक्ष श्री.दिपकजी कल्लुरे आदींची उपस्थिती होती.