Monday, June 7, 2021

सातब-यावर नोंद घेण्यासाठी ची जाचक अट रद्द करण्याची मागणी! राज्यमंञी संजय बनसोडे यांना निवेदन


देवणी प्रतिनिधी: खुल्या फलाॕटची सातबा-यावर नोंद करण्यासाठी खरेदीखताच्या किंमतीवरील 25 % एवढी रक्कम भरण्याचे नियम राज्य सरकार ने लागु केले आहे या जाचक आटीमुळे आनेक गरीब कुटुंब शासकीय योजनेपासुन वंचित राहत आहेत 
याबाबत ची अधिक माहिती अशी कि राज्य सरकारने खुल्या फलाॕट धारकांना मुळ जमीन मालकाच्या सातबा-यावर नोंद घेण्याचा नियम संपुर्ण राज्यात लागु केला आहे सातबा-यावर नोंद घेण्यासाठी खरेदी खतामध्ये नमुद केलेल्या रकमेच्या 25 % इतकी रक्कम सरकारी तीजोरीत भरल्यानंतरच फलाॕटची नोंद सातबा-यावर घेतली जाते या जाचक अटीमुळे अनेक गरीब कुटुंबातील लाभार्थी सरकारच्या विविध योजनेपासुन वंचित आहेत गरीब व सर्वसामान्य जनतेला 25 % इतकि रक्कम भरणे शक्य नाही म्हणून ही अट रद्द करण्याची मागणी शकिल मनियार यांनी राज्यमंञी संजय बनसोडे यांच्या कडे निवेदनादवारे केली आहे 

चौकट 
काही तालुक्यात तलाठ्याला पाच ते दहा हजार दिले तर हे नियम बाजुला सारुण सातबा-यावर घेतली जाते 2017 च्या जि आर नुसार 25 % रक्कम भरावी असे सांगण्यात येते परंतु 2017 पासुन मार्च 2021 पर्यंत देवणी शहर व तालुक्यात मोठया प्रमाणात फेरची नोंद घेतली गेली आहेत