Thursday, June 10, 2021

शिवणी येथे भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन

शिवणी प्रतिनिधी: शिवम पडलवार 
बिरसा यांनी नैतिक आचरणाने शुध्दता, आत्म-सुधार आणि एकेश्वर वादाचा उपदेश दिला .भारतीय इतिहासात बिरसा मुंडा यांना एक नायक म्हणून ओळखल जातं.
भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्य आज दि.9जून रोजी त्यांच्या फोटोला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
या वेळी शिवणी ग्रामपंचायत सरपंच सौ.लक्ष्मीबाई निळकंठ डुडुळे ग्रा.पं. सदस्य शंकर भिसे, यादव आमले गावातील नागरिक कामाजी भिसे,बाबुराव झळके,अशोक खोकले,विश्वनाथ झळके,नागोराव डुडूळे, आनंदराव खोकले,दत्ता भिसे,कशीनाथ झळके,शंकर दांडे,उमाजी खोकले तरुण मंडळी सोमनाथ दांडे,शिवम पडलवार,भागोराव डूडुळे, योगेश भिसे,रामा दांडे,माधव भुरके, सदानंद खोकले आदी नागरिक उपस्थित होते.