वलांडी प्रतिनिधी: मोमीन सगीर
लांबोटा देवणी तोगरी रस्त्याचे काम गेल्या महिनाभरापासून बंद असल्यामुळे चांगला असलेला रस्ता खोदून ठेवल्याने अनेक नागरिक पडून जखमी झाले आहेत. त्यामुळे त्वरित या रस्त्याचे काम पूर्ण करावे अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा ईशारा सार्वजनिक बांधकाम विभाग उपजिल्हाधिकारी व तहसीलदार व पोलीसठाणे.यांना देण्यात आलेल्या निवेदनात अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती, स्वाभिमान युवा मंच, आणि जयसंघर्ष वाहन चालक संघटना यांच्या वतीने देण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या पावसात अनेक दुचाकी वाहने घसरून अपघात होत असल्यामुळे नागरिकांतून रोष व्यक्त करण्यात येत आहे.सदरील कामाची चौकशी करून संबंधित गुत्तेदार व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, गुत्तेदार व कामावर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्याची मिलीभगत असल्याने कामाचा दर्जा घसरला आहे या कामाचे ज्या कांत्रटदाराकडून टेंडर घेण्यात आले आहे त्या कांत्रटदाराकडून रस्त्याचे काम करण्यामध्ये मोठा हलगर्जीपणा झाला असून, पूर्ण रस्ता उकरून त्यावर काळी माती टाकण्यात आली आहे. त्यावर प्रत्येक वाहन घसरत आहेत आणि नागरिक जखमी होत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूने खोदकाम केल्यानंतर मुरूम खडक घालण्या ऐवजी जी माती खोदकाम केल्यानंतर निघते तीच माती टाकून चांगल्या रस्त्याची देखील वाट लावण्यात आली आहे. पावसाळ्यात चिखलच चिखल होत तर उन्हाळ्यात धूळच धूळ होत आहे आहे त्यामुळे वाहनचालकांना आपला जीव मूठीवर घेऊन वाहन चालवावे लागते. दररोज वाहने घसरून जखमी होणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असून लोकप्रतिनिधी देखील या प्रकाराकडे पाहून शांत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
या रस्त्याचे काम संबंधित अधिकारी व गुत्तेदार यांनी संगनमत करून अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्याने या कामाची गुणनियंत्रण पथकामार्फत चौकशी करून संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करून कामात ज्या त्रुटी आढळल्यास त्या दोषी कंत्राटदारास काळ्या यादीत टाकावे व जे अधिकारी पदाचा गैरवापर करून ते कांत्रटदाराशी संगणमत करून निकृष्ट दर्जाचे काम केले आहेत अशा दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी व कामाचे बिल देयक चौकशी पूर्ण होईपर्यंत रोखण्यात यावे अशी मागणी नागरिकातुन होत आहे.
मात्र याकडे स्थानिक आमदाराने दुर्लक्ष का केले असावे असे कोडे वाहनधारकांना पडले आहे या दर्जाहिन कामाची गुणवत्ता नियंत्रक विभागाच्या उच्चस्तरीय समितीने तपासणी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवावा कंत्राटदाराला काळया यादीत समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी अन्याय,अत्याचार व भ्रष्टाचार विरोधी समिती, स्वाभिमान युवा मंच, जयसंघर्ष वाहन चालक संघटना अश्या अनेक संघटनांनी केली आहे.