अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील निवडी जाहीर
*अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य* या समिती मध्ये पूर्णा जि.परभणी येथील मीनाताई चोपडे यांची *परभणी महिला जिल्हा सचिव* पदी निवड तर चांदोरी जि.नाशिक येथील देविदास रौंदळ यांची *नाशिक जिल्हाध्यक्ष* पदी निवड तर उस्मानाबाद येथील अमित आगरकर यांची *उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष* पदी निवड तर *कोल्हापूर* येथील अॅड. परवेझ पठाण यांची *पश्चिम महाराष्ट्र कायदा सल्लागार* पदी निवड तर कळमनुरी जि.हिंगोली येथील शेख अय्युब यांची *हिंगोली जिल्हाध्यक्ष* पदी दुसऱ्यांदा फेर निवड तर *जालना* येथील जावेदखा पठाण यांची *सोशल मीडिया भोकरदन तालुकाध्याक्ष* पदी दुसऱ्यांदा फेर निवड तर पुणे येथील अमोल विधाटे यांची *पुणे जिल्हा महासंघटक* पदी निवड तर *पालम जि.परभणी* येथील इस्माईल बेग यांची *पालम तालुका सचिव* पदी निवड तर नाशिक येथील इम्रान शेख यांची *नाशिक जिल्हा उपाध्यक्ष* पदी निवड तर परंडा जि.उस्मानाबाद येथील विजय मेहेर यांची *उस्मानाबाद जिल्हा सचिव* पदी निवड करण्यात आली.
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य, या संघटनेची बैठक संपन्न झाली यावेळी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य चे *संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष नंदकिशोर धोत्रे यांनी* निवड करुण त्यांना तसे नियुक्तीपत्र देण्यात आले.
महाराष्ट्रात
*माहिती अधिकार, मानवीहक्क, पत्रकार संरक्षण,भ्रष्टाचार निर्मुलन, ग्राहक संरक्षण, कायद्याचा प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे, त्याच प्रमाणे नागरिकांना व शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण* देण्यात येणार आहे. *पत्रकार व माहिती अधीकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गुन्हे व हल्ले* या बाबत संघटितपणे लोकशाही व सनदशीर मार्गाने लढा दिला जाऊन कार्यकर्त्यांचे संगठन तयार करून *भ्रष्ट नोकरशाही चा माहिती अधिकार कायद्याचा* वापर करून पर्दाफाश करणार आहे. *सामाजीक, शैक्षणिक, सांस्कृतीक, वैद्यकिय क्षेत्रात, सरकारी कामात भ्रष्टाचार* होत असल्यास त्या विरुध्द तक्रार देऊन *उपोषण, अंदोलन* करू अशी माहीती संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी दिली.