वलांडी प्रतिनिधी.मोमीन सगीर
देवणी तालुक्यातील दरेवाडी येथे रासायनिक खताच्या वापरातून उत्पादित भाजीपाला बाजारात मिळतो. त्याचे भावही अव्वाच्यासव्वा असतात. अशात स्तनदा माता, गर्भवती महिला, लहान मुलामुलींच्या सुदृढ आरोग्यासाठी कमी खर्चात पोषक असा सकस आहार मिळावा. शिवाय, सेंद्रिय पध्दतीने उत्पादित फळभाज्या, पालेभाज्या व औषधी वनस्पती त्यांच्याच गावात दररोज उपलब्ध व्हाव्यात यासाठी उमेद अभियानामार्फत 'माझी पोषण परसबाग' या मोहिमेचा प्रारंभ आज दि. 21 जून 2021 रोजी तालुक्यातील VSTF ग्रामपंचायत दरेवाडी (बालाजीवाडी) येथे परसबागेच्या निर्मितीतून करण्यात आला. दरेवाडी येथील बालाजी महिला ग्रामसंघाच्या सौजन्याने सावित्रीबाई फुले महिला स्वयं सहायता समूहातील सदस्य श्रीमती संगीता दिगंबर देबडे यांच्या शेतात 50 बाय 50 फुटाचे परसबाग बनवण्यात आले. या परसबागेचे उदघाटन तहसीलदार सुरेश घोळवे व BDO मनोजकुमार राऊत या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित तालुका व्यवस्थापक राजेंद्रप्रसाद विडप, प्रभाग समन्वयक लता बोनाकृती मॅडम, सुखदेव मलवाड, सिद्धार्थ बेद्रे,राजेश बिरादार, CRP ज्योती पिटले, कृषी सखी सुनीता हलसे, FLCRP सारिका नमनगे, ग्रामसंघ लिपिका राणी नमनगे, तालुक्यातील सर्व CRP, FLCRP, वर्धिनी, बँक सखी, व ग्रामस्थ ई. तालुक्यात 600 परसबागेची निर्मिती उमेद अभियानामार्फत करण्याचा संकल्प केला आहे. या परसबागांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी उमेदची तालुकास्तरीय चमू प्रयत्न करीत आहे.