Tuesday, June 8, 2021

धुळे शहरातील गरीब केशरी कार्ड धारकांना लवकरच अन्न, धान्य मिळेल. आमदार फारूक शाह यांचे प्रयत्न..!

प्रतिनिधी मोहसीन शैख(धुळे)
दि,८ जून
 शहरातील  जनता अन्न, धान्यापासून वंचित राहत असल्यामुळे अन्न, धान्यांचा ईष्टांक (कोटा) वाढवून मिळणेबाबतचे निवेदन आमदार फारूक शाह यांनी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना दिले..!


पुरवठा विभागाच्या दुर्लक्षपणामुळे शहरातील गरीब जनता अन्न, धान्यापासून वंचित : आमदारांची पुरवठा मंत्र्यांकडे तक्रार..


(धुळे दि. ०८-०६-२०२१)  धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांनी आज महाराष्ट्राचे पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची मंत्रालयात भेट घेतली व धुळे शहरातील पुरवठा विभागाच्या दुर्लक्षपणामुळे व पुरवठा अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे धुळे शहरातील गरीब जनता तसेच विधवा, अपंग वंचित जनता अन्न, धान्यापासून वंचित राहात आहे. आमदारांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे कि,  महाराष्ट्रात व भारतात सुमारे २ वर्षापासून कोरोना काळामुळे अनेक नागरिक बेरोजगार झाले आहेत. व गरिबीची झळा सोसत आहे कोरोनामुळे अनेक घर उध्वस्त झाले. घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे त्यांना दोन वेळेचे अन्न मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत शासनाच्या विधवा, अपंग, मतिमंद, परितक्त्या, बेरोजगार गरीब नागरिकांसाठी असलेल्या योजना कार्यान्वित होत नाही आहेत. अनेक नागरिकांच्या शिधापत्रिकेवर धान्य मिळत नाही आहे. धुळे पुरवठा विभाग यांचा अक्षम्य दुर्लक्षपणामुळे गरीब जनता अन्न, धान्यापासून वंचित राहिलेली आहे शासनाचे निर्देश असताना सुद्धा धुळे पुरवठा विभागामार्फत फक्त ३०% आधार सिडींगचे काम झालेले आहे. आमच्या आमदार कार्यालयामार्फत सुमारे ४ हजार अर्ज आधार सिडींगसाठी पुरवठा विभागाला देण्यात आलेले होते. परंतु पुरवठा विभागामार्फत थातूरमातुर उत्तर देवून ह्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला बगल देण्याचे काम पुरवठा विभाग करीत आहे. धुळे शहरातील विधवा, अपंग यांची यादी महापालिकेजवळ तसेच संजय गांधी निराधार कार्यालयात असून देखील त्या कार्यालयातून यादी घेवून शासनाच्या धोरणाप्रमाणे गरीब नागरिकांना लाभ देण्याची दानत पुरवठा विभागाकडे नाही. धुळे शहर हा अविकसित व बेरोजगारीने ग्रस्त असल्यामुळे या भागातील वाढती लोकसंख्या बघता आपण आपल्या स्तरावर धुळे शहरासाठी अन्न, धान्याचा इष्टांक (कोटा) वाढवून देण्याचे करावे अशी विनंती या निवेदनाद्वारे आमदार फारूक शाह यांनी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच धुळे शहरासाठी वाढती लोकसंख्या बघून अन्न, धान्याचा ईष्टांक वाढविण्यात येईल. तसेच दारिद्र्य रेषेखालील अपंग, विधवा व अनाथ नागरिकांना पी.एच.एच. चा फायदा देण्याचे आश्वासन पुरवठा मंत्री यांनी दिले.