Tuesday, October 19, 2021

शिरूर ताजबंद येथे ईद मिलाद-उन-नबी जुलुस साजरा


शिरूर ताजबंद प्रतिनिधि: शादुल शेख
शिरूर ताजबंद ता.अहमदपुर येथे मंगलवारी दिनांक 19 जुलुस काढून ईद मिलाद-उन-नबी सन साजरा करण्यात आला या वेळी ईद मिलाद-उन-नबी कमेटी अध्यक्ष सादिक पाशा शेख व सुन्नी यूथ फोर्स चे आसिफ भाई किनीवाले यांनी सणा बद्दल माहिती सांगितले.
या वेळी जि. प गट नेते मंचकराव पाटिल ,चंद्रशेखर पाटिल, शिवानंद भोसले,महेश बिलापट्टे  शेख रहिम् उर्फ् (शेखुभाई) मुस्तफा सौदागर,मेहबूब सय्यद,मुन्ना शेख,महेताब सर, बादल शेख, अमीर सौदागर, अलाउद्दीन किनीवाले,गुलाब पठान,आदि उपस्थित होते या रैली चे आयोजक हुसेन किनीवाले, एमडी इरफ़ान शेख, एजाज मुंजेवार,अलीम शेख,मणियार शादुल,शेख सद्दाम, शेख इब्राहिम, आदि यांनी परिश्रम घेतले व आभार शादुल्ला शेख यांनी मानले.

मुक्रमाबाद येथील मोढा रोड व पोलीस स्टेशन रोड लवकर करा: अन्यथा आंदोलन करु

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती ची मागणी
मुक्रमाबाद प्रतिनिधी: शेख सैलानी
 मुक्रमाबाद येथील मोढा रोड व पोलीस स्टेशन रोड अपघाताचा सापळा बनले असुन. या दोन्ही रोडवर नालीचे पाणी साचलेले असते यामुळे नेहमी वाहने घसरून पडत असतात .मोढा रोड वरून तर माणसांना चालणे सुद्धा अवघड झाले आहे. याच रोड वरून शाळा, कॉलेज, मोढा, तलाठी कार्यालय, व पोलीस स्टेशन साठी नागरिकांचा नेहमी येणे जाणे करावे लागते.
 हा रस्ता अतिशय जिक्रीचा झाला असुन विद्यार्थ्यांना देखील चिकलातुनच आपली शाळा गाठवावी लागत आहे. तात्काळ दुरुस्त करावे. अन्यथा ग्रामपंचायत कार्यालय समोर उपोषणास बसण्याचा  इशारा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार समितीच्या वतिने निवेदनाद्वारे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांना देण्यात देण्यात आले. यावेळी अन्याय अत्याचार समितीचे मुक्रमाबाद शहरअध्यक्ष शेख सैलानी, शोहेब पठाण, खलील पटेल, शेख खालेद, मनान पटेल,शेख अनम,रियाज हिंगजीरे, कृष्णा पाटील बनवरे, अब्दुल हिंगजीरे, अविनाश पाटील, सदानंद घा व इतर नागरीक उपस्थित होते

Saturday, September 18, 2021

मा.ना.राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते सरफराज भाई मनियार यांना शिवरत्न पुरस्कार

लातूर प्रतिनिधी: लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृती दिनानिमित्त सरफराज भाई मनियार यांना
 शिवरत्न  पुरस्कार.देण्यात आले
 - लातूर मिशन वृतपत्र ०८ व्या वर्धीपन दिनाच्या निमित्ताने व शिवदर्शन फाऊंडेशन लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिवरत्न पुरस्कार २०२१ सामाजिक उपक्रम कोवीड १९ संकटकाळात केलेले कार्य याची दखल घेऊन  मा.ना.राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते पुरस्कार  देण्यात आला यावेळी पुरस्कार स्विकारतांना श्री.सरफराज मणीयार व इतर मान्यवर उपस्थित होते पुढील सरफराज भाई मणियार यांना पुरस्कार देण्यात आला व पुढील वाटचालीस  वतीने  शुभेच्छा देण्यात आले

Sunday, September 12, 2021

श्री.गणेश मंडळ बोळेगाव तर्फे खुर्ची रेस स्पर्धा.

शासनाच्या नियमाप्रमाणे एक गाव एक गणपतीची स्थापना देवणी तालुक्यातील बोळेगाव येथे श्री गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. श्री. गणेश मंडळातर्फे म्युझिक खुर्ची रेस स्पर्धा घेण्यात आली. यात प्रथम क्रमांक- सूर्यकांत कृष्णाजी चौधरी, द्वितीय क्रमांक - सुमित ओमप्रकाश आंबेवाले व तृतीय क्रमांक सौरभ रवींद्र गायकवाड याने पटकावला आहे. या विजेत्यांना शालेय साहित्य देऊन गणेश मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री. गणेश मंडळाचे पदाधिकारी- नवनाथ नागनाथ स्वामी,अविनाश राजशेखर झेरीकुंटे,शिवलिंग वीरभद्रआप्पा हिंडे, वैजनाथ राचया छोटीमट,बालाजी त्र्यंबक मुस्तापुरे, रामेश्वर गुरुनाथ मुस्तापुरे, संगमेश्वर ईश्वर मुस्तापुरे , महादेव पंढरीनाथ जडगे, जयप्रकाश तानाजी आंबेवाले, सतीश विशंभर जाधव, राजीव काशिनाथ चांडेश्वर,  हे उपस्थित होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने  स्पर्धक व गावातील  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेश मंडळाकडून हनुमान मंदिर परिसराची स्वच्छता

देवणी तालुक्यातील बोळेगाव येथील श्री गणेश मंडळाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत 
 या मंडळाच्या वतीने आज रविवारी हनुमान मंदिरा भोवतील परिसर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येऊन संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली . यावेळी नवनाथ स्वामी,अविनाश झेरीकुंठे,वैजनाथ स्वामी,शिवलिंग हिंडे,संगेश्वर मुस्तापुरे,विजयकुमार भंडे,रामेश्वर मुस्तापुरे,माधव जडगे,मनोज बिरादार,बालाजी मुस्तापुरे,सोमनाथ स्वामी,महेश झेरीकुंठे,कृष्णाजी चौधरी,अमित झेरिकुंठे,ओम झेरीकुंठे,अनिल तांबवाड,काशिनाथ गोटे उपस्थित होते.

Monday, August 9, 2021

कोतवालांच्या मागण्या करिता संघटनेचे तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंत्री, महसूल मंत्री यांना निवेदन.

देवणी प्रतिनिधी: राज्यस्तरीय आंदोलनचा एक भाग म्हणून आज क्रांती दिनी राज्यातील सर्व तालुक्यातून कोतवाल संवर्गाच्या मागण्या करिता मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात येत आहे. 
देवणी तालुका कोतवाल संघटनेतर्फे  देखील हे निवेदन तहसीलदार देवणी  यांना देण्यात आले. 
   तालुका अध्यक्ष गणेश इदलकंठे,  सचिव बिजापूरे व्यंकटरमण यलप्पा यांच्या  स्वाक्षरी ने हे निवेदन  देण्यात आले.

Tuesday, August 3, 2021

स्वातंत्र्य सैनिकाचे खोटे नामनिर्देशन प्रकरणात इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कर्णीयची मागणी सय्यद इद्रीस अहमद यांनी केली

प्रतिनिधी/ खतीब अब्दुल सोहेल 
स्वातंत्र्य सैनिकाचे बनावट नामनिर्देशनपत्राच्या आधारे शासनाची फसवणुक करणाऱ्या शाखा अभियंता एस एम देशमुख  यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी माहीती अधिकारी कारेकर्ता व अत्याचार निर्मूलन अभियान महाराष्ट्र मराठवाडा प्रमुख सय्यद इद्रीस अहमद यांनी केली.  सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एस एम देशमुख यांनी नौकरी मिळविण्यासाठी स्वातंत्र्य सेनानी श्री पंथरीनाथ अंबाजी मालुसरे रा, घोणसी ता,उदगीर यांच्याशी संगनमत करून सख्या बहिणीचा मुलगा/बाचा असे रक्ताचे नातेवाईक असल्याचे दाखवून शासनाची फसवणुक केली असल्याची तक्रार करत शाखा अभियंता एस एम देशमुख  यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी इतवारा पोलीस ठाण्यात केली आहे

Monday, August 2, 2021

शिरूर अनंतपाळ येथे ओबीसी मेळाव्याच्या कार्यशाळेची आढावा बैठक संपन्न ,

शिरूर अनंतपाळ दि,2 (पठाण फथेअलीखान )येथे गांधी चौक सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस च्याओबीसी मेळाव्याच्या कार्यशाळे ची आढावा बैठक ओबीसी विभागाचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण बतले शिरूर अनंतपाळ तालुका अध्यक्ष विठ्ठलराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे ,या आढावा बैठकीची सुरुवात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली ,
संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी वर जे अन्याय होत आहे आधी दिले पुन्हा काडून घेतले या केंद्राच्या जुलमी निर्णया विरुद्ध जनजागृती होणे गरजेचे आहे या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा,मा,ना,शरदचंद्र पवार ,राज्याचे उपमुख्यमंत्री मा,ना, अजित दादा पवार ,ओबीसी नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री मा,ना,जयंतराव पाटील ,राज्यमंत्री संजय बनसुडे ,युवक प्रदेश कार्याध्यक्ष सूरज दादा चव्हाण , ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष ईशवर बाळबुद्धे ,जिल्हा अध्यक्ष आ, बाबासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार लातूर जिल्हा अध्यक्ष ओबीसी सेल लक्ष्मण बतले यांनी शिरूर अनंतपाळ येथे संपूर्ण जिल्ह्यातील ओबीसी सेलची कार्यशाळा घेण्यासाठी प्रत्येक तालुक्याचे ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष ,कार्याध्यक्ष यांची आढावा बैठक आयोजित केली होती.
या बैठकीला संबोधित करताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य प्रा,मोहनराव भोसले यांनी मार्गदर्शन केले ,ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष ज्ञानोबा मोगले यांनी बोलताना व्यक्त केले की शिरूर अनंतपाळ येथे राष्ट्रवादीचे प्रवक्ते याच तालुक्याचे भूमिपुत्र सूरज चव्हाण याच्या आदेशाने शिरूर अनंतपाळ येथे कार्यशाळेचे आयोजन केले आहे प्रत्येक तालुक्यातून ओबीसी चे किमान 30 सैनिक तयार करून प्रत्येक तालुक्यात गावागावातून पवार साहेब आणि त्यांनी ओबीसी समाजासाठी केलेले कार्य तळागाळातील जनते पर्यंत पोहचवण्याचे काम हे सैनिक करतील अशी अपेक्षा मोगले यांनी व्यक्त केली ,अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष शेख महेताब ,जिल्हा उपाध्यक्ष बबन होनमाणे ,तालुका अध्यक्ष विठलंराव पाटील ,युवक ता,अध्यक्ष राज बर्गे ,महिला ता,अध्यक्ष सरोजा गायकवाड ,आदींची प्रमुख उपस्थिती होती ,
यावेळी उदगीर तालुका अध्यक्ष ओबीसी सेल जितेंद्र आडे ,शिरूर अनंतपाळ तालुका अध्यक्ष ज्ञानोबा मोगले ,कार्याध्यक्ष गोविंद  शेळगे ,चाकूर ता,अध्यक्ष किसन पाटील ,जळकोट ता,अध्यक्ष भिकाजी राठोड ,लातूर ता,अध्यक्ष अमोल पांचाळ ,निलंगा ता,अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे ,राहुल बोयने ,सावता माळी ,उद्धव मेकले ,नर्शीग विभूते ,सय्यद शब्बीर ,राजकुमार केंचे ,अविनाश चव्हाण ,ता,कार्याध्यक्ष अब्दुल अजीज मुल्ला ,जाहिर शेख ,तानाजी महाराज ,अनिल देवगरे ,शहर कार्याध्यक्ष संदीप धुमाळ ,नामदेव लोखंडे ,केदार लोंढे ,मेडिया ता ,अध्यक्ष शुभम ऎतंन बोने ,उस्मान मुल्ला ,आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा शहराध्यक्ष नंदू तांबोलकर यांनी केले तर अध्यक्षीय समारोप विठलं पाटील यांनी केले ,

जि.प.प्रशाळेत अशोकराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण.

शिरुर अनंतपाळ दि,2 (पठाण फथेअलीखान )येथील  कुमारस्वामीनगर  जि.प.प्रशाला भोजराजनगर, शिरुर अनंतपाळ व जि.प.शाळा, सुमठाणा येथे युवा नेते सुधीर लखनगावे यांनी शाळेत मा.अशोकभैय्या शिवाजीराव पाटील निलंगेकर  ( सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस पार्टी  यांच्या वाढदिवसा निमित्त जि.प. शाळेच्या प्रांगनात सप्तपर्णी वड, बेल, आवळा, करंजी, जांभ, सिसम, पिंपळ, सागवान, आंबा, बदाम ई. 56व्या वाढदिवसानिमीत्त 56 वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच खाण्यासाठी फळे, खेळण्यासाठी सावली व अँक्सीजन मिळावा या हेतुनी वाढदिवसानिमित्त युवा नेते सुधीर लखनगावे यांच्या पुढाकारातुन वृक्षारोपण केले असे पोलिस निरीक्षक कदम परमेश्वर यांनी बोलताना म्हणाले.
यावेळी  जि.प.शाळेच्या प्रांगणात अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसादिनी लावलेल्या आंबा झाडाचा तिसरा वाढदिवस महाविकास आघाडीच्या पदाधिकारीसह वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक कदम परमेश्वर, तालुका कृषी अधिकारी नाब्दे संजय, लक्ष्मणराव बोधले, सुधीर लखनगावे मेडिया सेल काॅंग्रेसचे तालुकाअध्यक्ष, आबासाहेब पाटील ऊजेडकर, राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे तालुकाअध्यक्ष विठ्ठलराव पाटील, शिवसेनेचे तालुकाअध्यक्ष भागवतराव वंगे, काॅंग्रेसचे शहराअध्यक्ष.अशोक कोरे, राष्ट्रवादीचे शहराअध्यक्ष. नंदकुमार तांबोळकर, शिवसेनेचे सतिश शिवणे, मुख्याध्यापक विजयकुमार संभाळे, मुख्याध्यापक पाडोळे तुकाराम, युवा नेते अनिल देवंगरे, काॅंग्रेसचे पदाधिकारी अमर आवाळे,महेश फुलारी, विठ्ठल चाळकीकर, बाबुराव तोरणे, दुरुगकर यश, संजय बिराजदार, डाॅं.बंडले संजय, अँड.माने सुतेज, बंडगर दत्ता, जागले वैशंपायन, अँड.पाटील महिपाल कारेवाडीकर, शंकर वाघमारे, पंडित लवटे, जगदिश सुर्यवंशी, अँड.लव्हांडे अनंत, जर्नाधन पाटील सुमठाणकर, ऊमाकांत शिंदे, मनोहर काळे, बानाटे शिवाजीराव, महेश तिवारी, तांबोळकर बस्वराज, अनंत शिंदे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी शेळगे गोविंद, लोंढे केदार, शिवसेनेचे व्यंकटराव ढोपरे, शिवसंतोष देशमुख ई.काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेना या महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील पदाधिकारी, सवणे बालाजी व शाळेतील शिक्षक देविदास सांगवे, महादेव सुर्यवंशी, काशिनाथ ऊंबरगे, रोहिदास नाब्दे, मिनाताई भुरे,  देवशटवार आश्विनी, सुर्यवंशी छायाताई ई. शाळेतील शिक्षक, पालक, नागरिक ऊपस्थीत होते..

आसिफ पटवेकर यांचा खर्च वैद्यकीय मंत्री यांनी वैद्यकीय कोठ्यातून उचलावा अल्पसंख्यांक समाजाची भूमिका.

लातूर अहेमद तांबोळी लातूर येथे असणारे रहिवासी 
आसिफ पटवेकर वय 14 वर्ष राहणार लातूर.
कित्येक दिवस झाले मदतीची पोस्ट व्हायरल होत आहे.
लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री,आणि वैद्यकीय मंत्री आमदार अमित देशमुख यांनी लक्ष घालून.स्वतःच्या कोठ्यातून किंवा वैद्यकीय कोठ्यातून या मुलाचा खर्च उचलावा  अशी विनंती वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे 
 आसिफ पटवेकर यांची तब्येत खुप क्रिटीकल आहे लातूरातील स्पर्श  हॉस्पिटल येथे एड्मिट होता पण सुधारना होत नसून सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटल येथे शिफ्ट करण्यात आला आहे.
यांना  मदतीची खुप आवश्यकता आहे, दवाखान्याचे खर्च करण्यासाठी कुटुंबाची परिस्थिती नाही, तरी लातूरकरांनी जे काही आपल्याने होईल तितके मदत करा व सामाजिक सहाय्य म्हणुन कुटुंबाला मदत करा अशी पोस्ट व्हायरल होत आहे मात्र अजून सुद्धा काही मोठ्या प्रकारची मदत आलेली नाही पालकमंत्री यांनी वैद्यकीय कोट्यातून मदत करावी अशी भूमिका अल्पसंख्याक समाजाकडून होत आहे
रुग्णाचे नाव: आसिफ पटवेकर
 वय: 14
 वडिलांचे नाव: अतीक पटवेकर
 पत्ता: मदनी मस्जिद, जवळ लातूर.
गुगल पे नं :- अजहर पटवेकर 9146317679
 रोगाचे नाव: DKA diabetic ketoacidosis होईल तेवढी लातूरकरांनी मदत करावी ही नम्र विनंती *लातूर अहेमद तांबोळी*

Saturday, July 31, 2021

वलांड़ी येथे साहित्य रत्नं लोक शाहिर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी.

वलांडी प्रतिनिधी सगीर मोमीन: वलांड़ी येथील संभाजी नगर येथे जगत विख्यात साहित्य रत्नं लोक शाहिर अण्णा भाऊ साठे यांची 101वी जयंती गावकरी यांच्या वतीने साजरी करण्यात आली. साहित्य रत्न लोक शाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतमी चे पूजन वलांड़ी नगरीचे माजी सरपंच असदुल्लाखा पठाण यांच्या हस्ते करून अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी पंचयात समितीचे माजी सभापति तुकाराम पाटिल, दत्ता डुब्बे, रिपाई चे विलास वाघमारे, लहू रामराव सुर्यवंशी, माजी उपसरपंच दिनेश पाटिल, शफिक सौदागर, महेश महाजन, माजी ग्रा.प.सदस्य धनराज बनसोडे, ज्ञानोबा गायकवाड, राम वाघमारे, श्री राम भंडारे, इमाम बौडी वाले, बशिर अम्बुलगे, पप्पु बनसोडे, लारब शेख, तानाजी सुर्यवंशी, तानाजी कांबळे, वैजनाथ मुंजाळ, कुणाल मुंजाळ, गोविंद कार्ले व इतर गावकरी यांच्या उपस्तितीत अतिश बाजी करुन साजरी करण्यांत आली....

Friday, July 23, 2021

सिनेअभिनेते श्री मंकरद दादा अनासपुरे यांच्या वाढदिवसानिमीत्त लागवड केलेल्या वृक्षाचा वाढदिवस साजरा करत समाजापुढे "झाडे लावा,झाडे जगवा" चा संदेश

वलांडी प्रतिनिधी: मौजे धनेगांव ता देवणी येथे  जैष्ठ सिनेअभिनेते श्री मंकरद दादा अनासपुरे यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने गतपाच वर्षापुर्वी काही वृक्ष लागवड केली होती,व आज  श्री मंकरद अनासपुरे यांचा वाढदिवसानिमीत्ताने त्या वृक्षाचाही केक कापुन व वृक्षलागवड करुन  वाढदिवस साजरा करण्यात आला.
व झाडे लावा ,झाडे जगवा चा संदेश 
आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या  वाढदिवसानिमीत्त  लावलेले एखादे झाड  तेही स्वत: जोपासलेले. व  अशा झाडाचा वाढदिवस साजरा करून  झाडे लावा झाडे जगवा हा अनोखा संदेश  सामाजिक कार्येकर्ते भाजयुमो अध्यक्ष श्री रामलिंग शेरे यांनी दिला आहे   आज वाढदिनानीम्मीत्ताने.
  साजरा झालेल्या  वृक्षांमध्ये  कडुनिंब  , कडुलिंब , सप्तपर्णी , सोनचाफा , ,बहावा,मधुमालती, चिंच, आवळा, वड, पिंपळ,    इत्यादी  झाडांचा अंतर्भाव आहे.......
 यावेळी  श्री रामलिंग शेरे, श्री बाळासाहेब बिरादार,श्री दिपक पवार, श्री लक्ष्मण पवार , श्री लक्ष्मण पवार,
श्री शंकर आपटे,श्री बालाजी आपटे, यलाप्पा आपटे आदिसह अनेकांची उपस्थिती होती

गंगाखेड़ मध्ये प्रवाशांचे बेहाल

गंगाखेड़ तालुका प्रतिनिधि शफ़ीक़ तंबोली: गंगाखेड़ येथील बस स्थानकात जान्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे प्रवाशांना बस स्थानकात जान्यासाठी कसरत करावी लागत आहे रस्त्याची दुरुस्ती कधी होणार याची नागरिक प्रतीक्षा करत आहेत.

Thursday, July 22, 2021

ऑटोरिक्षावर झाड कोसळून ऑटोचालकांचा दुर्दैवी मृत्यू

लातूर अहेमद तांबोळी: लातूर मध्ये दयानंद गेट परिसरातील श्री मारुती काळे यांचा ऑटो रिक्षा वर झाड कोसळून अपघातात झाला व त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला लातूर शहर महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन टीम, व लातूर शहर एमआयडीसी पोलीस ठाणे येथील टीम च्या मदतीने सदर व्यक्तीचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी झाडाला कापून तुकडे पाडण्यात आले त्यानंतर झाडाला बाजूला काढून मृतदेह बाहेर काढण्यात आले यावेळी लातूर शहर महानगरपालिका चे उप महापौर चंद्रकांत बिराजदार यांनी वेळोवेळी सूचना दिल्या व काळे परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.. असे आश्वासन दिले व
या दुर्दैवी घटनेमुळे सर्व नागरिकांना विनंती केले की पावसाळा सुरू असल्यामुळे कृपया कोणीही झाडाजवळ किंवा पडक्या घराजवळ थांबू नका.. असे आश्वासन उप महापौर चंद्रकांत बिराजदार यांनी दिले

महागिरी येथील शहजाद अपार्टमेंट या अतिधोकादायक इमारतीचा भाग कोसळला

ठाणे शहर प्रतिनिधी लुबना मेमन:
प्रभाग क्र. 22 मधील महागिरी येथील शहजाद अपार्टमेंट या अतिधोकादायक इमारतीचा भाग कोसळला असून सुदैवाने जिवितहानी झाली नाही. परंतु इमारतीमधील सोळा कुटूंबांचे तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले सदर घटना घडताच उपमहापौर पल्लवी पवन कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे, सुनील हंडोरे व नम्रता कोळी तसेच महापालिका उपआयुक्त अशोक बुरपल्ले, ज्ञानेश्वर ढेरे, सहायक आयुक्त शंकर पाटोळे व इतर अधिकारी-कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन इमारतीमधील सोळा कुटूंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले असून पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी उपमहापौर पल्लवी पवन कदम यांनी प्रशासनाला केल्या आहे.

Tuesday, July 20, 2021

देगलूर- उदगीर- रेनापूर राज्य महामार्ग १६८ मधील मारजवाडी ते रावी रस्ता दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे; अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती ची मागणी.

मुक्रामाबाद प्र.शेख सैलानी: देगलूर- उदगीर- रेनापूर राज्य महामार्ग १६८ मधील मारजवाडी ते रावी हा रस्ता अत्यंत निकॄष्ट दर्जाचा झाला होता सद्या या रस्त्यावरून वहतुक करणे म्हणजे जिव हातात  घेऊन चलने अशी रस्त्याचि अवस्था झालेली आहे हा रस्ता दुरुस्तीसाठी एक पदरी मंजूर झालेला आहे तरी पण अद्यापपर्यंत त्याचे कसल्याच प्रकारचे काम सुरू झालेले नाही या रस्त्यावरून वहतुक करताना वहानधारकांना जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे त्यामुळे अपद्याताचे प्रकार सुध्दा वाडत आहे या साठी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीने.मा अभियंता साहेब सा.बा.वि.देगलुर,व सा.बा.वि. नांदेड यांना निवेदन देण्यात आले त्या वेळी उपस्थित  मु. श. अध्यक्ष.शेख सैलानी .मु.श. उपाध्यक्ष शोहेब पठाण म.जि.उपाध्यक्ष सविता चप्पलवार. नागेश दादा ई चि उपस्थिती होती

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सय्यद जमीर भाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गंगाखेड उपजिल्हा रुग्णालय येथे आरो पाणी फिल्टर लोकार्पणसोहळा संप्पन

गंगाखेड तालुका प्रतिनिधि शफ़ीक़ तंबोली:  जमीर भैय्या मित्र मंडळचे संस्थापक अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात वाटर फिल्टर बसविण्यात आले.
उपजिल्हा रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची खुप अडचण निर्माण झाली होती, पाण्यासाठी येथील येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना भटकंती करावी लागत असल्याचे सय्यद जमीर भाई यांच्या लक्षात आले व त्यांनी आपला वाढदिवस साध्या पद्धतीने करून ज्या उपजिल्हा रुग्णालयात पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न निर्माण झाला होता तो त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने उपजिल्हा रुग्णालयात वाटर फिल्टर बसून आपला वाढदिवस साजरा केला....
या वाटर फिल्टरचे उदघाटन उपजिल्हा रुग्णालयाचे वैधकीय अधिक्षक डॉ.हेमंत मुंढे,डॉ. उमाकांत बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त जमीर भय्या मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयातील रुग्णाला फळे पण वाटप केली.
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.हेमंत मुढे, डॉ.बिराजदार,प्रणीत खज्जे, सय्यद अल्ताफ भाई ,इंतेसार सिद्दीकी , वसीम हाशमी, समि सय्यद,अविनाश बर्वे,विशाल दादेवाड,कुलदीप जाधव, गणेश निरास, माधव भोसले,तबरेज आलम. इकबाल चाउस,बाबा खान, सैफ चाउस,
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सैफ चाऊस,बाबा खान,सचिन खंदारे,सलमान खान ,विजय साळवे, सय्यद इरफान,व्यंकटेश भेंडेकर,सय्यद समीर, शेख समी,सय्यद आवेस, सय्यद सोहेल, सय्यद आयाज, सय्यद शोयेब  आदींनी परिश्रम घेतले,

Monday, July 19, 2021

आदिवासी विकास विभागातर्फे किटवाटप


कन्नड:कन्नड तालुक्यातील सावरगाव येथे आदिवासी विकास विभागातर्फे पात्र आदिवासी कुटुंब यांना खावटी अन्नधान्य किट वाटप करण्यात आले. डीबीटी च्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना दोन हजार रुपये व अन्नधान्य वाटप करण्यात आले.  श्रीमती देवकन्या बोकडे प्रकल्प अधिकारी औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय आश्रमशाळा नागद चे मुख्याध्यापक श्री.एस.बी.भिसे,श्री.आर.बी.गिते     सर,श्री.एस.एन.मुळे सर, श्री.पी.आर.धोंडकर सर, श्री.शिंदे सर,श्री.डी. डी. परदेशी सर.श्री.खलापुरे सर,श्रीमती बागुल मॅडम या सर्व कर्मचारी यांनी गावोगावी जाउन आदिवासी  बांधव यांना खावटी अन्नधान्य किट चे वाटप केले.यावेळी सावरगांव ग्रामपंचायत चे सरपंच विकास निकम उपसरपंच मुस्तकिम शेख ग्रामपंचायत सदस्य शिवा नाईक . रमेश माळी . पांडुरंग निकम माजी सरपंच सिध्दू शेख ग्रामपंचायत कर्मचारी ईरशाद शेख़ सुदाम निकम आप्पासाहैब गायकवाड़ आदि गावकरी सह उपस्थित होते.

सुर्डी नजिक मध्ये नऊ वर्षा च्या बालीकेवर लैगिंक अत्याचार

माजलगांव प्रतिनिधि: नाजेर कुरैशी  
ग्रामीण पोलिस स्टेशन माजलगांव येथे दि. 13/07/ 2021 रोजी FIR क्रमांक 0176/2021 मध्ये आरोपी पुरुषोत्तम श्रीराम घाटुळ रा. सुरडी नजीक ता. माजलगांव जि. बीड च्या विरोधात भादवी कलम 376 (M) व बालकाचे लैंगीक अपराधापासुन स्वरक्षन अधिनीयम 2012 चे कलम 4,5 (M), 6, 10, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असे की पीडीत अल्पवयीन मुलगी ही वय 9 वर्षाची असुन, नराधम आरोपीच्या अत्याचारामुळे गंभीर दुखापत झाली व अती रक्त स्त्रावामुळे शासकीय रुग्णालय अंबाजोगाई येथे दाखल करण्यात आली होती तीच परिस्थीती गंभीर आहे. तरी सुध्दा सदरहु गुन्ह्यातील आरोपीला मा. न्यायालया समक्ष हजर करून पी.सी. आर. मागुन सखोल चौकशी करण्याची गरज असतांना तपास अधिकारी यांनी पी. सी. आर.ची मागणीच केली नाही व सरळ सरळ आरोपीला जामीनासाठी मोकळा रस्ता करुन दिला आहे. ग्रामीण पोलीस स्टेशनची भुमीका संषयास्पद असल्याचे दिसुन येते. म्हणुन माजलगांव दि,18/07/2021 करीता आम्ही खालील सह्याकरणारे या निवेदणाद्वारे अशी मागणी करत आहोत की, 1) सदरहु प्रकरणातील तपास अधिकारी याची सखोल चौकशी करुन योग्यती कार्यवाही करुन दंडीत व निलंबीत करण्यात यावे. 2) आरोपीस कायम निकाल लागेपर्यंत मा. न्यायालयाच्या कोठडीत ठेवून जलद गती कोर्टात प्रकरण चलवण्यासाठी शासन स्तरावर योग्य ती कारवाई करावी. 3) सदर प्रकरणाचा तपास इतर योग्य त्या सक्षम अधिकान्याला देवून प्रकरणात विष्पक्ष तपास करावा.
आरोपी हा पीडीताच्या विरुध जातीचा असल्यामुळे व पीडीता ही अल्पसंख्याक समाजातुन असल्यामुळे आरोपी जर जामीनावर सुटुन आल्यास तपास कामात अडथडा निर्माण करु शकतो व गावात व परीसरात जातीय तेड निर्माण होण्याची शक्यता आहे करीता मा. साहेबांना विनंती आहे की, त्यांनी सदर प्रकरणात तात्काळ दखल घेवुन पीडीतास न्याय द्यावा

Sunday, July 18, 2021

अनशरा हाशमीचे दहावी घवघवीत यश

उदगीर प्रतिनीधी: उदगीर येथील अलामीन ऊर्दू माध्यमिक विद्यालयातील अनशरा हाशमी हीने शंभर टक्के मार्क घेवुन घवघवीत यश संपादन केले आहे. प्रथमिक पासुन शाळेत प्रथम असलेल्या अनशराला तीच्या सर्व शैक्षणिक शिक्षणाचे मुल्यमापन केल्यानंतर हे यश मिळाले आहे.
जागतिक महामारी मुळे शैक्षणीक गुंणवतेवर परिणाम होत असुन यंदाची शालांत परिक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मुल्यमापन करुन गुण देण्याचे ठरवले. त्यामुळे शाळेत कायम अव्वल असलेल्या अनशरा हाशमी हीला ९९. ८० टक्के गुण मिळाले आहेत. तीच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Thursday, July 15, 2021

इनामुल हसन कब्रस्तान सेवा समितीचे महानगर पालिकेला इनामुल हसन कबरीस्तान दुरुस्ती करण्याची मागणी.

लातूर अहेमद तांबोळी: लातूर महापालिकेने नेमलेल्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी  इनामुल हसन कब्रस्तान सेवा समितीच्या वतीने महापौर आणि आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले.  कब्रस्तान मध्ये अनेक सोयी सुविधांचा प्रश्न निर्माण झाला आहे कबरस्तान साठी जागा अपुरी पडत असल्याने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी तसेच कंपाऊंडवाल बांधून द्यावे लाईटीची सुविधा करून द्यावे. अनेक प्रकारच्या सुविधा इनामुल हसन कबरस्तान समितीच्यावतीने करण्यात आले आहेत मुरूम टाकने पाण्याचे बोर पाडणेअसे अनेक प्रकारचे सुविधा समितीच्या वतीने करण्यात आलेले आहेत मात्र आता महापालिकेने काही सुविधा करून द्याव्यात अशी मागणी इनामुल हसन कबरस्तान समितीच्या वतीने करण्यात आली याप्रसंगी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते

Tuesday, July 13, 2021

वलांडी बसस्थानकावर वयोवृद्ध प्रवासी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पळविले! टोळीतील ५ महिला चोराविरुद्ध गुन्हा दाखल.

वलांडी प्रतिनिधी मोमीन सगीर: देवणी तालुक्यातील वलांडी बसस्थानकावर उदगीरला जाणाऱ्या बसमध्ये चढतांना वयोवृद्ध प्रवासी महिलेच्या गळ्यातील दिड तोळे सोन्याचे दागिने पळविले. टोळीतील पाच महिला चोरांना वलांडी पोलिसांना काही वेळातच पकडण्यात यश आले. या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात पाच चोरटे महिला विरोधात मंगळवार दि.१३ जुलै रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

     याबाबत देवणी पोलीसांच्या वतीने मिळालेली अधिक माहिती अशी की, लेकीच्या घरी ढवाळ जेवणाचे कार्यक्रम उरकून परत जात असताना वयोवृद्ध महिला दि.१२ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वलांडी बसस्थानकावर उदगीरकडे जाणाऱ्या बसमध्ये चढताना तीच्या गळ्यातील दिड तोळा सोन्याचे पान मन्याची चैन जुनी वापरती कि अंदाजे ४५ हजार रुपयांचे दागिने चोरून लंपास केले. घटनेची माहिती मिळताच वलांडी पोलीस दुरक्षेत्रचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिनगारे व पोलीस कर्मचारी राजपाल साळुंखे यांनी काही वेळातच वलांडी बसस्थानक परिसरातून टोळीतील पाच चोरटे महिलांच्या मुस्क्या आवळल्या चौकशी केली असता त्यांच्याकडे दागिने मिळून आले नाही. या प्रकरणी सुशीलाबाई माधवराव शिराळे वय ८० वर्षे राहणार शेकापूरवाडी ता.उदगीर यांच्या फिर्यादिवरुन देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २०७/२०२१ कलम ३७९, ३४ भादवी प्रमाणे बबिता सुरेश उपाध्याय राहणार उदगीर, मिराबाइ प्रकाश कांबळे राहणार उदगीर,  गोदावरी राजु कांबळे राहणार लाळी,  छाया राजेश उपाध्ये राहणार लाळी,  पुनम युवराज उपाध्ये राहणार उदगीर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नारायण डप्पडवाड हे करीत आहेत.

परतूर तालुक्यातील कोकाटे हादगाव येथे १५० नागरिकांना दिले लस

प्रतिनिधी नरहरी राठोड: परतूर तालुक्यातील कोकाटे हादगाव येथे लसीकरण कॅम्प करण्यात आला या वेळी 150 लसीकरण पुरवठा करण्यात आला 150 लाभार्थ्याने लसीकरण करण्यात आले यावेळी डॉ राठोड श्रीमती रामगडे आरोग्य सेविका देशमुख साहेब पुंजरवाड सर डाके सर आरोग्य सेविका रेखा पाठक आणि श्रीमती वंदना ढवळे आशा कार्यकर्त्या व मा पंचायत समिती उपसभापती परदीप आप्पा ढवळे सरपंच सौ स्मिता भरत ढवळे उपसरपंच ज्ञानोबा चव्हाण  सर्व ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते सदर कॅम्प हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकाटे हादगाव येथे आयोजित करण्यात आला होता प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृद्ध यावेळी उपस्थित होते.

Friday, July 9, 2021

लातूर भाजी मार्केट स्थलात्तराच्या मागणी बाबत सर्व घटकांना विश्वासात घेऊन सर्वमान्य तोउगा काढावा पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांचे आदेश.

लातूर अहेमद तांबोळी: लातूर येथील भाजी मार्केट स्थलांतरा बाबत व्यापाऱ्यांची मागणी आणि कृषी उत्पन्न्‍ बाजार समितीची व्यवहार्यता तपासून या संदर्भाने नियुक्त केलेल्या समितीने सर्व घटकांना मान्य होईल असा सर्वमान्य निर्णय घ्यावा, अशी सुचना राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे. 
  लातूर शहरातील भाजी मार्केट बाहयवळण रस्त्यावर स्थलांतरीत करण्या बाबत संबंधित व्यापाऱ्यांनी केलेली मागणी, यामध्ये असलेली मतमत्तातरे त्याच बरोबर बाहयवळण रस्त्यावरील जागेत सध्या सुरू असलेला कडबा आणि जनावरांचा बाजार या संदर्भाने असलेली कृषी उत्पन्न बाजार समितीची भुमिका, शिवाय हे भाजी मार्केट स्थलातरीत करायचे ठरले तर नवीन ठिकाणी उभाराव्या लागणाऱ्या सुविधा या बाबींचा अभ्यास करून निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री ना. अमित देशमुख यांच्या सुचनेवरून बाजार समिती संचालक मंडळातील ज्येष्ठ सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. सदरील समिती सोबत शुक्रवारी पालकमंत्री ना. देशमुख यांनी दुरदृष्य प्रणालीव्दारे मंत्रालयातुन आढावा बैठक घेतली. 
   बैठकीच्या प्रारंभी ना. देशमुख यांनी सर्व समिती सदस्यांचे म्हणणे ऐकूण घेतले त्यांनतर भाजी मार्केट मधील व्यापारी यांची मागणी, त्यांच्यातील मतमतात्तरे, जुन्या भाजी मार्केट मधील जागा, तेथे विस्तार करण्यासाठी असलेला वाव, नवीन ठिकाणी उभाराव्या लागणाऱ्या सुविधा, त्यासाठी लागणारा वेळ, कडबा व जनावर बाजारासाठी शोधावा लागणारा पर्याय या संदर्भातील बाजार समितीची भुमिका या गोष्टीचा अभ्यास करावा, सर्व घटकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी व सर्वमान्य निर्णय घ्यावा, अशा सुचना पालकमंत्री देशमुख यांनी केल्या आहेत. 
  या आढावा बैठकीस बाजार समितीचे सभापती ललीत शहा, उपसभापती मनोज पाटील, संचालक सुधिर गोजमगुंडे, विक्रम शिंदे, रावसाहेब पाटील, गोविंद नरहरे, भास्कर शिंदे, श्री बिदादा तसेच संबंधित अधिकारी सहभागी झाले होते. 
-------------

गुंठेवारी चळवळ संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य मराठवाडा कार्यकारणी जाहीर.

उदगीर प्रतिनिधी खिज़र मुन्शी: उदगीर तालुका व परिसरातील महसुल विभागात सामान्य जनतेचे जमिनी विषयी प्रश्न सोडविण्यासाठी गुंठेवारी चळवळ संघर्ष समितीची कार्यकारिणी जाहीर केलेली आहे.गुंठेवारी संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंदन दादा चव्हाण यांनी जाहीर गुंठेवारी मराठवाडा विभागीय अध्यक्ष म्हणून मा. मोईज भाई शेख, उपाध्यक्ष मा. अखिल खालील शेख , आणि सचिवपदी मा. आकाश रमेश पारके यांची निवड करण्यांत आलेली आहे. या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

माहिती अधिकार कायदा अंमलात येऊन १५ वर्षानंतरही श्रीवर्धन तालुक्यातील गृप ग्रामपंचायत कार्यालय-दिघी येथे माहितीचे फलक लावण्यात आलेले नाहीत

सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र शासन,सामान्य प्रशासन विभाग,परिपत्रक क्र.अहत-१००८/प्र.क्र. १८/०८/११-अ,मंत्रालय,मुंबई-४०००३२,दिनांक:-१५/०५/२००८ अनुसार प्रत्येक शासकिय कार्यालयात माहिती अधिकार अधिनियम,२००५ अन्वये नियुक्त करण्यात आलेल्या माहिती अधिकारी आणि अपिलीय अधिकारी यांच्या नावाचे फलक लावणे बंधनकारक आहे तसेच नियम ४ खालील १७ बाबींवरील अद्ययावत माहिती राज्य शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक असताना माहिती अधिकार अधिनियम,२००५ अंमलात येऊन तब्बल १५ वर्षानंतरही श्रीवर्धन तालुक्यातील गृप ग्रामपंचायत कार्यालय-दिघी येथे माहितीचे फलक लावण्यात आलेले नाहीत तसेच नियम ४ खालील १७ बाबींवरील अद्ययावत माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.याबाबत श्री.परशुराम पायाजी पायकोळी (दिघी) - सदस्य माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ यांनी जनहिताच्या दृष्टीने पंचायत समिती श्रीवर्धन यांचे कार्यक्षेत्रामध्ये माहीती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत माननीय,गटविकास अधिकारी,पंचायत समिती श्रीवर्धन यांस दिनांक :- ०१/०२/२०१९ रोजी विनंती अर्ज दाखल केला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने दिनांक :- ३०/०३/२०१९ रोजी श्री.मधुकर हरी भालदार,जन माहिती तथा ग्रामविकास अधिकारी,गृप ग्रामपंचायत कार्यालय-दिघी यांस मुद्देनिहाय नियोजन करून त्याप्रमाणे केलेल्या कार्यवाहीचा अहवाल अर्जदारास व या कार्यालयास सादर करावा असे आदेश दिले होते.परंतु त्यांचेकडून सदर आदेशानुसार अद्यापपर्यंत  कोणत्याही प्रकारे कार्यवाही करण्यात आलेली नाही.सदर बाबत दिनांक:- १४/०९/२०२० रोजी स्मरणपत्र पाठविण्यात आले होते.सदर स्मरणपत्रासहि संबंधितांकडून केराची टोपली दाखवण्यात आली.आपले वरिष्ठ गटविकास अधिकारी यांचे आदेशास केराची टोपली दाखवण्यात आली तसेच माहिती अधिकार अधिनियम,२००५ आणि संबंधित शासकिय परिपत्रके,सन्माननीय न्यायालयांचे निर्णय यांचे वारंवार उल्लंघन करण्यात आले आहे.त्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील नागरीकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.तसेच सदर श्री.मधुकर हरी भालदार-जन माहिती अधिकारी,गृप ग्रामपंचायत कार्यालय-दिघी हे आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी- पंचायत समिती श्रीवर्धन हे स्वत:ला कायद्यापेक्षा श्रेष्ठ समजतात का? अशी चर्चा श्रीवर्धन तालुक्यातील नागरिक करत आहेत.सदर संबंधित दोषींवर वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार कि नाही? याकडे श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांमध्ये जोरदार चर्चा चालू आहे.

Thursday, July 8, 2021

वृक्षलागवड व संर्वधन ही काळाजी गरज उपजिल्हाधिकारी श्री गणेश महाडिक

धनेगांव - ता देवणी  येथे  मा.आ.श्री संभाजीराव पाटील निंलगेकर साहेबांच्या वाढदिवसानिमीत्ताने धनेगांव येथे संम्शानभुमी परिसरात वर्गमिञ आॅक्सिजन हब  भाजयुमो तालुका अध्यक्ष श्री रामलिंग शेरे यांच्या माध्यमातुन  वृक्षलागवड सप्ताहाचे आयोजन करुन वृक्ष लागवड करण्यात आलीआहे , या वृक्षलागवडीची पाहणी करण्यासाठी  मा. जिल्हाधिकारी साहेंबाचे नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हा अधिकारी श्री गणेशजी महाडिक साहेब  व मनरेगा, बीडीओ श्री  महेंद्र कुलकर्णी यांनी भेट देऊन गावातील महादेव मंदीर परिसरात  करण्यात आलेली वृक्ष लागवड.  व गांवअर्तगत  रस्ताच्या दुर्तफा बाजूला गतवर्षी लागवड करणाण्यात आलेल्या  वृक्षाची पाहणी करुन पाहुन  धनेगांव ग्रामस्थांनी  लोकसहभागातुन  ही  वृक्ष लागवड करुन त्याचे संर्वधन  केल्याबद्ल अभिनंदन केले यावेळी बोलताना  श्री महाडिक साहेब म्हणाले की 
आज जर  आपण 
एकूण सारासार विचार  केला तर पृथ्वीचे आरोग्य राखणे म्हणजे आपले आरोग्य राखण्यासारखेच आहे. पृथ्वीचे आरोग्य राखण्यामध्ये वने झाडे ही  अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. एक मोठे झाड छोटय़ा-छोटय़ा वनस्पती, कीटक, प्राणी-पक्षी यांना आसरा देते. विषारी कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन जागतिक तापमानवाढ कमी करते आणि प्राणवायू असलेल्या ऑक्सिजनचे उर्त्सजन करते. वनांमुळे जमिनीची धूप रोखली जाते. जमिनीत पाणी मुरते व पूर-दुष्काळ यांसारख्या आपत्ती रोखण्यास मदत होते. तसेच वनांपासून फळे-फुले, औषधे, मसाले, रंग, जनावरांसाठी चारा, जळणासाठी, निरनिराळ्या वस्तू बनविण्यासाठी आणि घरबांधणीसाठी लाकूड मिळते.  लातुर येथील शेतकर्‍यानी व्यवसाईक शेतीकडे वळावे, यामध्ये बाबु लागवड ,व फळलागवड ,याकडे प्रामुख्खाने लक्ष द्यावे यामुळे वृक्षलागवड ही होईल व शेतकर्‍यानां यामाध्यमातुन रोजगार ही उपलब्ध होईल  व . पृथ्वीविषयी कृतज्ञतेची भावना बाळगणे, आपली पृथ्वी स्वच्छ, सुंदर व हरित ठेवणे, ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. म्हणूनच वनक्षेत्र व वृक्षलागवड  वाढण्यासाठी सर्वानी जास्तीत जास्त प्रयत्न  करुन वृक्षाचे संर्वधन करण्याची गरज आहे असे मत उपजिल्हाधिकारी श्री गणेशजी महाडीक म्हणाले,

*चौकट*
मा.श्री संभाजीराव पाटील निंलगेकर यांच्या  वाढदिवसाच्या निमीत्ताने वृक्षसप्ताहाचे आयोजन करुन 1400  देशी वृक्षाची लागवड केल्याबद्ल श्री रामलिंग शेरे व वर्गमिञ आॅक्सीजन हब टीमचे कार्य कौतुकास्पद आहे याच्या कार्याचा आर्दश इतरांनी घेवुन असे वृक्षलागवड सप्ताहाचे आयोजन करुन वृक्षलागवड करुन संर्वधन करावे असे गौरउदगार 
उपजिल्हाधिकारी श्री गणेश महाडिक यांनी केले 

यावेळी देवणीची तहसिलदार श्री सुरेशजी घोळवे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री अच्युत पाटील, संरपंच पती श्री हरिभाऊ परीट ,उपसंरपंच श्री रविद्रकुमार पाटील, भाजयुमो तालुका अध्यक्ष श्री रामलिंग शेरे, ग्रामसेवक श्रींकात पताळे , श्री बाळासाहेब बिरादार, श्री दिपक पवार, श्री लक्ष्मण पवार,  श्री सखाराम चव्हाण , श्री अनिल राठोड ,श्री अमित बिरादार,श्री बालाजी बिरादार, श्री शंकर आपटे,   श्री ज्ञानेश्वर बिरादार , आदिसह ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते

Tuesday, July 6, 2021

जिथं समस्या गंभीर तिथं AK खंबीर

औसा: प्रभाग क्र 10 येथील अजीम प्राथमिक शाळेपासुन ते फैसल कादरी याच्या घरापर्यंत रोड व नाली चे काम सुरू आहे खंदक मस्जिद च्या बाजूस काही स्थानिक नागरिकचा बांधकाम मटेरियल पडल्यामुळे  संबंधित गुत्तेदार तो भाग सोडून काम सुरू केला होता तर इथल्या नागरिकांनी मला प्रत्यक्ष भेटून या समस्या बाबत सागितल्या वर मी तात्काळ फोन द्वारे लोकनियुक्त नगराध्यक्ष अफसर शेख यांना मी वरील विषया संदर्भात सुचना केली असता तर त्यांनी लगेच सबंधित गुत्तेदार ला निर्देश देऊन काम करून घेण्यासाठी निर्देश दिले माझ्या तक्रार वर नगराध्यक्ष अफसर शेख यांनी लवकर कार्यवाही केल्या बद्दल धन्यवाद 
विरोध करा पण कायदेशीर करावा

बिबट्याचा संशयास्पद मृत्यू अनाड शिवरात

अजिंठा प्रतिनिधी: अजिंठा  वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या अनाड वनक्षेत्र भागातील  वालकडू शिवारामध्ये  एक बिबट्या संशयास्पद मृत अवस्थेत आढळून आल्याची घटना सोमवारी सकाळी अघडकीस आली .  या  घटनेची माहीती मिळताच 
वन विभागाचे कर्मचाऱ्यांसह अधिकारी सकाळी घटनास्थळी दाखल झाले होते . पाचशे फुट खोल दऱ्या असून या क्षेत्रात   घनदाट जंगल आहे. येथे वन्यप्राण्यांचा सतत वावर असतो. 
  शेतशिवारात सकाळी ग्रामस्थ शेतात जात असताना त्यांना बिबट्या पडून दिसला. जवळ जाऊन बघितले असता तो मृत असल्याचे आढळून आला. याची माहिती वन कर्मचाऱ्यांना देण्यात आली. वन विभागाचे   कर्मचारी अधिकारी घटनास्थळी  दाखल झाले . पाहणी  करून  शवचिकित्सा  करण्यात आले .  
हा  बिबट्य  पाच ते सहा वर्षाचा असून त्याचा  नेमका  दहा ते पंधरा दिवस पूर्वी मृत्यू   झाला असावा संशय वन विभागाने व्यक्त केला  .मात्र त्या बिबटयाचा मृत्यू कशामुळे झाला  हे कळू शकले नाही  . यासंदर्भात वन विभागाच्या  अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी मार्फत संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही .

पत्रकार जुनेद बागवान यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल ; आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी

गेवराई प्रतिनिधी: अवैध धंद्याच्या बातम्या का छापतोस म्हणत याद राख, या पुढे आमच्या विरोधात बातम्या देशील तर, तुला जिवे मारू, अशी धमकी देत, पाच युवकांनी पत्रकार जुनेद बागवान यांच्यासह त्यांच्या सोबत असलेल्या एका मित्रावर लोखंडी राॅडने व कोयत्याने मारहाण करत जिव घेणा हल्ला केल्याची घटना सोमवार दि. 5 रोजी घडली असून, पत्रकार बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात पत्रकार बागवान बालंबाल बचावले असून, त्यांच्या मित्राला गंभीर दुखापत झाली आहे. त्यास गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पत्रकार बागवान यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या पाचही युवकांना तातडीने अटक करावी, अशी मागणी गेवराई येथील पत्रकारांनी केली असून या हल्याचा तिव्र निषेध केला आहे.

Monday, July 5, 2021

लातूर मध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने लावली हजेरी

लातूर :अहेमद तांबोळी
लातूरमध्ये सोमवारी मोठ्या पावसाने हजेरी लावली सुमारे चार वाजता पावसाने हजेरी लावली किमान दीड तास पाऊस मोठ्या प्रमाणात चालू होता पावसाळा सुरू झाला तेव्हापासून हा पाऊस सर्वात मोठा पाऊस ठरलेला आहे या पावसाने लातूरकर खूप आनंदित आहेत गंजगोलाईच्या आजूबाजूचा परिसर उंचीवर असल्यामुळे गंजगोलाई ते आजूबाजूच्या परिसरातील पाणी हे सर्व बायपास रिंग रोड डी-मार्ट जवळ धाव घेतो त्यामुळे बायपास वरील हा दृश्य आढळून आला नागरिकांना थोडासा त्रास सहन करावा लागला मात्र हा मोठा पाउस बघून लातूरकर खूप आनंदित आहेत या पावसाने कदाचित ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली नाही त्यांना हा पाऊस दिलासादायक आहे नक्कीच त्यांचे पेरणी होतील
व मांजरा बॅरेज मध्ये पाणी वाढेल अशी विचारधारा लातूरकर व्यक्त करत आहेत

आत्महत्याग्रस्त कुटुंबास शासनाची सर्वोतोपरी मदत - राज्यमंत्री अब्दुल सत्तार उंडणगावातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची सांत्वन भेट

औरंगाबाद सिल्लोड तालुक्यातिल  उंडणगाव येथे शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केली. या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी स्वतः महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार तसेच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी उंडणगाव येथे पाडळे कुटुंबाच्या घरी जावून कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला. 
पाडळे कुटुंबाला स्वपदरची तसेच शासनाच्या वतीने आर्थिक मदत, कुटुंबातील मुलांना सरकारच्या वतीने शिक्षणाची सुविधा यासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देऊ, अशी ग्वाही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कुटुंबाला दिली.
घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून याबाबत पंचनामा करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शासन घेईल. त्यासोबतच पीडित कुटुंबाला घरकुल, मुलांना जातीचे प्रमाणपत्र, अंत्योदय योजनेतून मोफत धान्य, बालगृह अशा विविध योजनांचा लाभ देण्यासाठी तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. एखाद्या घरात कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्यानंतर कुटुंबाची वाताहत होते. सामाजिक बांधिलकी लक्षात घेवून उंडणगाव येथील आत्महत्याग्रस्त कुटुंब स्वबळावर उभी राहावे. यासाठी कुटुंबांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने केल्या जाईल, असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाडळे कुटुंबाला किराणा किट तसेच जीवनावश्यक वस्तू दिल्या याशिवाय स्वपदरची आर्थिक मदत देणार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.

*आत्महत्या हा पर्याय नाही*

   सततची नापिकी व कर्जबाजारीपणा यासाठी आत्महत्या हा पर्याय नाही असे स्पष्ट करीत शासन शेतकऱ्यांच्या खंबीर पाठीशी आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही अडचणी असल्यास त्या निदर्शनास आणून द्याव्यात जेणे करून त्या समस्येची सोडवणूक करण्यात येईल. आत्महत्या मुळे आपल्या कुटुंबाचे प्रश्न सुटत नाहीत, उलट यात वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्ये सारखा टोकाचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी अशोक दांडगे, जि. प. माजी सभापती राजाराम पाडळे, माजी उपसरपंच शांतीलाल बसये, माजी सरपंच मोतीराम पाडळे, सय्यद जब्बार, दीपक चौथे, जगन पाटील, सय्यद नासेर, समाधान पाडळे  यांच्यासह नायब तहसीलदार किरण कुलकर्णी, नायब तहसीलदार विनोद करमनकर, मंडळ अधिकारी राजाराम ससाणे,तलाठी विष्णू  सोनवणे, ग्रामसेवक ज्ञानेश्वर बोराडे आदिंची उपस्थिती होती.
*असे आहे कुटुंब*
सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून उंडणगाव येथील संतोष खंडू पाडळे ( 40 वय ) व संगीता संतोष पाडळे ( 32 वय ) या अल्पभूधारक शेतकरी दाम्पत्याने बुधवार (दि.30) रोजी आत्महत्या केली. त्यांना  जवळपास 6 लाख रुपयांचे कर्ज देणे होते. त्यांच्या पश्चात आई- शांताबाई खंडू पाडळे 70 वर्ष,
मुलगा- मानव संतोष पाडळे 10 वर्ष, 
मुलगी- आरती संतोष पाडळे 12 वर्ष,
मुलगी -भारती संतोष पाडळे 14 वर्ष,
मुलगी-यशोदा संतोष पाडळे 8 वर्ष, व
मुलगी - दिव्या संतोष ( विवाहित ) वय 19 असे कुटुंब आहे. या कुटुंबातील शांताबाई यांच्याशी राज्यमंत्री सत्तार आणि जिल्हाधिकारी चव्हाण यांनी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले.

छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पुतल्यासाठी जागा देण्याची सर्व पक्षीय व सर्व राजकीय,सामाजिक संघटनांची मागणी

गंगाखेड तालुका प्रतिनिधि शफीक तंबोली: गंगाखेड़ नगर परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासाठी  जागा देण्यात यावी या मागणीसाठी आज नगर परिषदेस सर्व पक्षीय व सर्व राजकीय, सामाजिक संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी विष्णु मुरकुटे, सत्यपाल सालवे, प्रमोद मस्के, श्रीकांत भोसले व इतर उपस्थित होते.