अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती ची मागणी
मुक्रमाबाद प्रतिनिधी: शेख सैलानी
मुक्रमाबाद येथील मोढा रोड व पोलीस स्टेशन रोड अपघाताचा सापळा बनले असुन. या दोन्ही रोडवर नालीचे पाणी साचलेले असते यामुळे नेहमी वाहने घसरून पडत असतात .मोढा रोड वरून तर माणसांना चालणे सुद्धा अवघड झाले आहे. याच रोड वरून शाळा, कॉलेज, मोढा, तलाठी कार्यालय, व पोलीस स्टेशन साठी नागरिकांचा नेहमी येणे जाणे करावे लागते.
हा रस्ता अतिशय जिक्रीचा झाला असुन विद्यार्थ्यांना देखील चिकलातुनच आपली शाळा गाठवावी लागत आहे. तात्काळ दुरुस्त करावे. अन्यथा ग्रामपंचायत कार्यालय समोर उपोषणास बसण्याचा इशारा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार समितीच्या वतिने निवेदनाद्वारे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांना देण्यात देण्यात आले. यावेळी अन्याय अत्याचार समितीचे मुक्रमाबाद शहरअध्यक्ष शेख सैलानी, शोहेब पठाण, खलील पटेल, शेख खालेद, मनान पटेल,शेख अनम,रियाज हिंगजीरे, कृष्णा पाटील बनवरे, अब्दुल हिंगजीरे, अविनाश पाटील, सदानंद घा व इतर नागरीक उपस्थित होते