Tuesday, July 6, 2021

बिबट्याचा संशयास्पद मृत्यू अनाड शिवरात

अजिंठा प्रतिनिधी: अजिंठा  वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या अनाड वनक्षेत्र भागातील  वालकडू शिवारामध्ये  एक बिबट्या संशयास्पद मृत अवस्थेत आढळून आल्याची घटना सोमवारी सकाळी अघडकीस आली .  या  घटनेची माहीती मिळताच 
वन विभागाचे कर्मचाऱ्यांसह अधिकारी सकाळी घटनास्थळी दाखल झाले होते . पाचशे फुट खोल दऱ्या असून या क्षेत्रात   घनदाट जंगल आहे. येथे वन्यप्राण्यांचा सतत वावर असतो. 
  शेतशिवारात सकाळी ग्रामस्थ शेतात जात असताना त्यांना बिबट्या पडून दिसला. जवळ जाऊन बघितले असता तो मृत असल्याचे आढळून आला. याची माहिती वन कर्मचाऱ्यांना देण्यात आली. वन विभागाचे   कर्मचारी अधिकारी घटनास्थळी  दाखल झाले . पाहणी  करून  शवचिकित्सा  करण्यात आले .  
हा  बिबट्य  पाच ते सहा वर्षाचा असून त्याचा  नेमका  दहा ते पंधरा दिवस पूर्वी मृत्यू   झाला असावा संशय वन विभागाने व्यक्त केला  .मात्र त्या बिबटयाचा मृत्यू कशामुळे झाला  हे कळू शकले नाही  . यासंदर्भात वन विभागाच्या  अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी मार्फत संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही .