शिरूर अनंतपाळ दि,2 (पठाण फथेअलीखान )येथे गांधी चौक सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस च्याओबीसी मेळाव्याच्या कार्यशाळे ची आढावा बैठक ओबीसी विभागाचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण बतले शिरूर अनंतपाळ तालुका अध्यक्ष विठ्ठलराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे ,या आढावा बैठकीची सुरुवात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली ,
संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी वर जे अन्याय होत आहे आधी दिले पुन्हा काडून घेतले या केंद्राच्या जुलमी निर्णया विरुद्ध जनजागृती होणे गरजेचे आहे या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा,मा,ना,शरदचंद्र पवार ,राज्याचे उपमुख्यमंत्री मा,ना, अजित दादा पवार ,ओबीसी नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री मा,ना,जयंतराव पाटील ,राज्यमंत्री संजय बनसुडे ,युवक प्रदेश कार्याध्यक्ष सूरज दादा चव्हाण , ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष ईशवर बाळबुद्धे ,जिल्हा अध्यक्ष आ, बाबासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार लातूर जिल्हा अध्यक्ष ओबीसी सेल लक्ष्मण बतले यांनी शिरूर अनंतपाळ येथे संपूर्ण जिल्ह्यातील ओबीसी सेलची कार्यशाळा घेण्यासाठी प्रत्येक तालुक्याचे ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष ,कार्याध्यक्ष यांची आढावा बैठक आयोजित केली होती.
या बैठकीला संबोधित करताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य प्रा,मोहनराव भोसले यांनी मार्गदर्शन केले ,ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष ज्ञानोबा मोगले यांनी बोलताना व्यक्त केले की शिरूर अनंतपाळ येथे राष्ट्रवादीचे प्रवक्ते याच तालुक्याचे भूमिपुत्र सूरज चव्हाण याच्या आदेशाने शिरूर अनंतपाळ येथे कार्यशाळेचे आयोजन केले आहे प्रत्येक तालुक्यातून ओबीसी चे किमान 30 सैनिक तयार करून प्रत्येक तालुक्यात गावागावातून पवार साहेब आणि त्यांनी ओबीसी समाजासाठी केलेले कार्य तळागाळातील जनते पर्यंत पोहचवण्याचे काम हे सैनिक करतील अशी अपेक्षा मोगले यांनी व्यक्त केली ,अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष शेख महेताब ,जिल्हा उपाध्यक्ष बबन होनमाणे ,तालुका अध्यक्ष विठलंराव पाटील ,युवक ता,अध्यक्ष राज बर्गे ,महिला ता,अध्यक्ष सरोजा गायकवाड ,आदींची प्रमुख उपस्थिती होती ,
यावेळी उदगीर तालुका अध्यक्ष ओबीसी सेल जितेंद्र आडे ,शिरूर अनंतपाळ तालुका अध्यक्ष ज्ञानोबा मोगले ,कार्याध्यक्ष गोविंद शेळगे ,चाकूर ता,अध्यक्ष किसन पाटील ,जळकोट ता,अध्यक्ष भिकाजी राठोड ,लातूर ता,अध्यक्ष अमोल पांचाळ ,निलंगा ता,अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे ,राहुल बोयने ,सावता माळी ,उद्धव मेकले ,नर्शीग विभूते ,सय्यद शब्बीर ,राजकुमार केंचे ,अविनाश चव्हाण ,ता,कार्याध्यक्ष अब्दुल अजीज मुल्ला ,जाहिर शेख ,तानाजी महाराज ,अनिल देवगरे ,शहर कार्याध्यक्ष संदीप धुमाळ ,नामदेव लोखंडे ,केदार लोंढे ,मेडिया ता ,अध्यक्ष शुभम ऎतंन बोने ,उस्मान मुल्ला ,आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा शहराध्यक्ष नंदू तांबोलकर यांनी केले तर अध्यक्षीय समारोप विठलं पाटील यांनी केले ,