Wednesday, July 17, 2019

देवणी तालुक्यात विविध पदाधिकाऱ्यांची निवड

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती मध्ये लातुर जिल्ह्यातील देवणी तालुक्यामध्ये विविध पदावर झालेली निवड सोशल मिडीयाच्या देवणी तालुका अध्यक्षपदी शकिल मनियार यांची तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण रणदिवे यांची निवड तर सचिवपदी जाकिर बागवान यांची निवड तर अल्पसंख्याक सेलच्या तालुकाध्यक्षपदी मुकतारभाई तांबोळी यांची निवड करण्यात आली.
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती, या संघटनेच्या छोट्या खानी कार्यक्रमात अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांच्या हस्ते देवणी तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्याची  निवड करुण  त्यांना तसे  नियुक्तीपत्र देण्यात आले.
महाराष्ट्रात
 माहिती अधिकार, #मानवीहक्क, #पत्रकार संरक्षण,#भ्रष्टाचार निर्मुलन, #ग्राहक संरक्षण, #कायद्याचा प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे, त्याच प्रमाणे नागरिकांना व शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पत्रकार व माहिती अधीकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गुन्हे व हल्ले या बाबत संघटितपणे लोकशाही व सनदशीर मार्गाने लढा दिला जाऊन  कार्यकर्त्यांचे संगठन तयार करून भ्रष्ट नोकरशाही चा माहितीअधिकार कायद्याचा वापर करून पर्दाफाश करणार आहे. सामाजीक, शैक्षणिक, सांसक्रतीक, वैद्यकिय क्षेत्रात, सरकारी कामात भ्रष्टाचार होत असल्यास त्या विरुध्द तक्रार देऊन उपोषण, अंदोलन करू अशी माहीती संस्थापक अध्यक्ष यांनी दिली.
यावेळी कवी तात्याराव सुर्यंवशी,सिकंदर तांबोळी,दादाराव गायकवाड,फकीर खुरेशी,मारुती रणदिवे,उद्धव रणदिवे,ओम श्रीमंगले यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते
या निवडी बद्दल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे