अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती मध्ये कौसडी(परभणी) येथील शेख नईमोद्दीन यांची जिंतूर तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती, या संघटनेची बैठक दि.13/07/2019 संपन्न झाली यावेळी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अहेमद अन्सारी यांनी निवड करुण त्यांना तसे नियुक्तीपत्र देण्यात आले.
महाराष्ट्रात
*माहिती अधिकार, #मानवीहक्क, #पत्रकार संरक्षण,#भ्रष्टाचार निर्मुलन, #ग्राहक संरक्षण, #कायद्याचा प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे, त्याच प्रमाणे *नागरिकांना व शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण* देण्यात येणार आहे. *पत्रकार व माहिती अधीकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गुन्हे व हल्ले* या बाबत संघटितपणे लोकशाही व सनदशीर मार्गाने लढा दिला जाऊन कार्यकर्त्यांचे संगठन तयार करून *भ्रष्ट नोकरशाही चा माहितीअधिकार कायद्याचा* वापर करून पर्दाफाश करणार आहे. *सामाजीक, शैक्षणिक, सांसक्रतीक, वैद्यकिय क्षेत्रात, सरकारी कामात भ्रष्टाचार* होत असल्यास त्या विरुध्द तक्रार देऊन *उपोषण, अंदोलन* करू अशी माहीती संस्थापक अध्यक्ष यांनी दिली.
*या निवडी बद्दल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे*