इस्माईल शेख व सौदागर महमंद रफी यांचे स्वागत सन्मान.
लातुर :- येथे दिनांक 05/07/2019 रोजी सायंकाळी 09-30 वाजता मित्र परिवारच्या वतीने इस्माईल शेख (मुख्याध्यापक साने गुरुजी लातुर), सौदागर महमंद रफी (अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, विरोधी, समीती आणी पुरुष हक्क संरक्षण समीती अध्यक्ष तथा जनसामान्याचा कायदा संपादक) यांचा सन्मान करण्यात आला.
अन्याय ,अत्याचार,भ्रष्टाचार, विरोधी समिती व पुरुष हक्क संरक्षण समीती यांच्या संयुक्त च्या वतीने पुणे येथे राज्यस्तरीय अधीवेशन उद्यान कार्यालय येथे यशस्वी रित्या अल्पवधी काळात संपन्न केल्या बद्दल संघटनेचे अध्यक्ष सौदागर महमंद रफी व साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक इस्माईल शेख ज्यांनी अथक परिश्रमाने हाँटेल कामगार ते मुख्याध्यापक असा खडतर प्रवासातुन शिक्षण हस्तगत केले. व यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवारच्या वतीने दोन्ही युवा संघर्ष करत वाटचाल करत आहेत युवकांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने पुष्पगुच्छ देवुन स्वागत करण्यात आले या प्रसंगी मा. खदिरजी मणीयार ,अब्दुल समद शेख ,हारुण देवणीकर , मुज्जफर इनामदार ,रफिक कुरैशी आदी उपस्थित होते.