Tuesday, December 22, 2020

अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे नवीन पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांचा पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तर्फे सत्कार


अंबाजोगाई प्रतिनिधी:- मोहंमद ताहेर

अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक म्हणुन बाळासाहेब पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तर्फे पुष्पगुच्छ देवून सत्कार करतांना दै.जंगचे प्रतिनिधी अहेमद पठाण, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या मराठवाडा संपर्क प्रमुख तथा पत्रकार न्याय हक्क न्युज मराठी तालुका प्रतिनिधी मोहंमद ताहेर सत्तार,शेतकरी कामगार पक्षाचे शहराध्यक्ष वजीर भाई, सामाजिक कार्यकर्ते शेख खलंदर भाई,शेख मुदस्सर भाई,शकिल भाई गवळी इत्यादी उपस्थित होते

Saturday, December 19, 2020

ग्रामीण रुग्णालयासाठी मंत्रीगणाला वलांडीकरांचे साकडे


मंत्र्याची भेट घेवुन मांडली आरोग्य सुविधेची कैफियत

वलांडी प्रतिनिधी.सगीर मोमीन

ः तालुक्यातील सिमाभागातील वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देवुन या भागातील आरोग्य सुविधा सुलभ व्हाव्यात यासाठी वलांडी ग्रामपंचायतच्या वतीने राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडुन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या पाठपुरावा करणार असल्याचे सुतोवाच शिष्टमंडळास दिले.
वलांडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत आठ उपकेंद्रेसह ३३ गावाची आरोग्य सुविधा पुरवली जाते.शिवाय सिमाभागातील कर्नाटक राज्यातील नागरिकांचा लोंढाही या रुग्णालयाकडे येतो.उद्दिष्टापेक्षा जास्त होणाऱ्या  कुटुंबशस्त्रक्रिया होत असतात.कोरोनासारख्या महाभयंकर अजारावर प्रतिबंध करताना येथे  झालेली गर्दी ,अपुरे वैद्यकीय अधिकारी  , कर्मचारी,औषधाचा अभाव यामुळे रुग्णाची नेहमीच हेळसांड होत आहे.यासर्व बाबी परवा वलांडी येथील शिष्टमंडळाने मुंबई येथे भेट देवुन  प्राथमिक आरोग्य केंद्रास ३० खाटाचे ग्रामीण रूग्णालय मंजुरी द्यावी अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे ,लातुरचे पालक मंत्री अमित देशमुख, संजय बंनसोडे , बाळासाहेब थोरात  यांना भेटुन आरोग्याची कैफियत मांडली. व उभयंताना निवेदन देण्यात आले.यावेळी वलांडीचे राष्ट्रवादी महाराष्ट्र सहसचिव  मोहम्मद रफी सय्यद,माजी सभापती गोविंदराव  भोपणीकर,मधुकर लाडंगे यांनी वलांडीचे प्रतिनिधित्व करत निवेदन सादर केले.
जि.प.चा ठराव मंत्रालयाकडे...
वलांडी येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे यासाठी २९ सप्टेंबर २०१८ रोजी जि.प कडे पाठवण्यात आला.याची दखल घेत जि.प.च्या सर्वसाधारण बैठकीत ठराव पारीत करुन ३ सप्टेबंर १९ रोजी आरोग्य मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे.

बनसोडे नी स्वीकारली जबाबदारी...
संजय बनसोडे हे हेर विधानसभा मतदार संघातुन आमदारकीसाठी इच्छुक होते.या भागाचे लोकप्रतिनिधी होता आले नसले तरी आता जिल्ह्याचे मंत्री अन वलांडीसाठी असलेले प्रेम म्हणुन ग्रामीण रुग्णालय मंजुरी करण्याची जबाबदारी संजय बनसोडे यांनी स्वीकारली अशी माहिती शिष्टमंडळाने दिली.

महाराष्ट्र मजुरहीत कामगार संघटना तर्फे सामाजिक कार्यकर्ते सरफराज मणियार यांचा सत्कार.

लातूर प्रतिनिधी: अहेमद तांबोळी
लातूरमध्ये सरफराज भाई मनियार लॉक डाऊन काळामध्ये गोरगरीब नागरिकांना मदतीचा हात म्हणून समोर आले होते   लॉकडाऊन काळामध्ये गोरगरीब मजुरांना राशन किट वाटप केली जिथे कुठे मजूर वर्ग त्रस्त दिसतात सरफराज भाई मनियार तेथे हजर होऊन त्यांची मदत करत होते  लॉक डाऊन काळामध्ये मदत केली जर कोणाच्या मुलीच्या लग्नांमध्ये काही अडचण येत असेल तेथे सरफराज भाई मणियार  त्यांची मदत करतात हेच नाही तर वेगवेगळ्या स्वरूपात सरफराज भाई मणियार  काम करतात सरफराज भाई मनियार यांचा कार्य लक्षात घेता महाराष्ट्र मजुरीत कामगार संघटना तर्फे सरफराज भाई मणियार.यांचा सत्कार करण्यात आला कोरोना योद्धा सन्मानपत्र देण्यात आले व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी  महाराष्ट्र मजुरीत कामगार संघटना चे संस्थापक अध्यक्ष मो. गौस सय्यद. बाबासाहेब धोत्रे. फय्याज शेख. .व संघटनेचे अधिक पदाधिकारी उपस्थित होते

कुंभेफळ येथील मतदान यादी दुरुस्ती वरती फारुक शेख यांचा अक्षेप!


दोषी वर कार्यवाही ची मागणी.
परंडा प्रतिनिधी: फारुक शेख
दी . -7 /  12 / 2020 रोजी मा . तहसीलदार साहेब तहसील कार्यालय परडा कडे रितसर मतदान यादी दूरुस्ती साठी आके शेप घेतले होते नंतर मला परंडा तहसील कार्यालय तहसीलदार यांच्यां सहीचे प्रत्र मला दिले पत्र  9/12/2020 . व मळाले त्या प्रत्रात आसै ली हलै की तूमचा  दि 7 / 12/2O 20चा आकशेप मान्य केल आहे मि दि .16 / 12 / 2020 रोजी तहसील कार्यालय परंडा येथे जाऊन मतदान यादी 200 रु देउन यादी घेतली त्या यादी मध्ये आसे दिसलै की यादी ना दूरूस्ती झालेली आहे . तक्रारी आर्ज कार्यवाहीसाठी दिलेले आहे दि..17 / 12 / 2020 रोजी मा . जिल्हा अधिकारी उस्मानाबाद व उप विभागीय अधिकारी भूम व नियुकती पदोन्नती अस्थापना विभाग उस्मानाबद व मा . तहसील दार कार्यालय परंडा , माहीतीस्तव कार्यवाही स्तव प्रत रवाना शेख फारुक उस्मान.
..

Saturday, December 5, 2020

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर संपन्न.

अंबाजोगाई प्रतिनिधी: मोहम्मद ताहेर
दिनांक 05 डिसेंबर 2020 रोजी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शासकिय रक्तपेढीत रक्ताची कमतरता असल्यामुळे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने भव्य रक्तदान  शिबीरास प्रमुख उपस्थित म्हणुन AIMIM चे बीड जिल्हा प्रवक्ता रमीज सर,प्रहार जनपक्षाचे बीड जिल्हा संघटक जहांगीर भाई पठाण,अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती चे मराठवाडा संपर्क प्रमुख मोहंमद ताहेर, शासकिय रक्तपेढीतील कर्मचारी, MSFच्या जवानांनी व अॅटोचालक मालक युनियन इतर मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत 37 रक्तदात्यांनी रक्तदान करुन समाजापुढे एक आदर्श निर्माण ठेवला

Friday, December 4, 2020

वलांडी ते हैद्राबाद बस सेवा सुरू करण्याची मागणी!


वलांडी प्रतिनिधी: सगीर मोमीन

कर्नाटक कांग्रेस प्रदेशअध्यक्ष माजी मंत्री तथा भालकीचे आमदार इश्वर खंडरे साहेब यांची भेट घेऊन वलांडी ते हैद्राबाद बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी वलांडी गावचे सरपंच महेमुद सौदागर, कांग्रेसचे जेस्ट नेते रामभाऊ भंडारे, व राष्ट्रवादी महाराष्ट्र सह सचीव मोहम्मद रफीक सैय्यद  उपस्थित होते.
यावेळी साहेबांनी बससेवा लवकरात लवकर चालू करू असे आश्वासन दीले.