माजलगाव (प्रतिनिधी)
आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यांक सेल च्या वतिने प्रभाग क्र.९ मध्ये आमरण उपोषण बागवान गल्ली मध्ये करण्यात आले होते.प्रभाग ९ मधील विविध समस्या संदर्भात म्हणजेच झेंडा चौक ते दालमिल जवळ मनूर रोड पर्यत रस्ता बनवन्यात यावा,शहरात धुर फवारणी निर्जतूंणीकरण फवारणी करण्यात यावे,मूल्ला मस्जीद,जामा मस्जीद ,ते पाटील गल्ली रस्ता बनवण्यात यावा बूखारी ऊर्दू शाळे जवळील पूल मोकळा करण्यात यावा,तसेच प्रभाग ९ मधील साठे नगर,आंबेडकर नगर,पाटील गल्ली,बागवान गल्ली मधिल नाल्या साफ करण्यात याव्या या विषयास धरूण अमरण ऊपोषण करण्यात आले.या वेळी उपोषणकर्ते म्हणून राॅ.काॅ. अल्पसंख्यांक शहराध्यक्ष मोसीन बागवान ,व रहिम चौधरी हे होते या उपोषणास मानवी हक्क अभियानचे अशोक ढगे,अलिशेर,कुरैशी, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिति चे मुस्ताक कुरैशी ,मोझम कुरैशी, लोकदशा पेपर चे नाजेर भाई व इतर नागरीकांनी जाहीर पाठींबा दिला.हे उपोषण लेखी म्हणजेच मासिक सभा झाली की हे कामे करू अशा आशयाचे पञक नगर परिषदचे ओ .एस. शायद अली साहेबनी आदोंलन कर्त्यास लेखी दिले व हे उपोषण तूर्तास थांबवले. या वेळी अंदोलनकर्त्यांनी मासिक सभा झाली की वरील कामे केली नाही तर उग्र स्वरूपाचे अंदोलन करण्यात येईल असा ईशारा दिला.