Saturday, June 15, 2019

पुणे येथे संघटनेचे राज्य स्तरीय अधिवेशन.



अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य व पुरुष सरक्षण समिती यांच्या वतीने राज्य स्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे या अधिवेशनात अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती चे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी व प्रदेश स्तरावरील पदाधिकारी हे माहिती अधिकार, मानवी हक्क, पत्रकार संरक्षण, ग्राहक संरक्षण, भ्रष्टाचार निर्मुलन व पुरुष संरक्षण या सहीत संघटनेचे ध्येय व धोरणे, या बाबत मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत तरी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती व पुरुष संरक्षण समितीचे महाराष्ट्रातील संपूर्ण पदाधिकारी व सदस्य तसेच नागरिकांनी या अधिवेशनात आवर्जून उपस्थित रहावे.
कार्यक्रमाचे वेळ व स्थळ ठिकाण : उद्यान कार्यालय, टिळक रोड, खजिना विहीर चौक, सदाशिव पेठ, पुणे.
दि. 30 जुन 2019 रोजी संध्याकाळी 4:30 ते 8:00 रात्री पर्यंत कार्यकम

इक्विटास बँकेचे एक पाऊल सामाजीक कार्याकडे





इक्विटास स्माल फायनान्स बँक ली निलंगा शाखा तर्फे  वर्धापन पण दिनानिमित्त रोप वाटिका व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते निलंगा येथे काही वर्षातच नावारूपाला आलेली इक्विटास स्मॉल फायनान्स बँक ली तर्फे वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायण रोपवाटिका व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले यामध्ये   अनेक लोकांनी सहभाग नोंदवला व पंधरा जणांनी  रक्तदान केले व रोपवाटिका वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष नगर परिषद अध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रल्हाद  बाहेती ,फारुख देशमुख, पुणे येथील ब्रँच चे रिजनल हेड देवेन्द्र पाटील, सोलापूर ब्रँच चे कलस्टर हेड कमल गांधी निलंगा शाखेचे ब्रँच मॅनेजर संदीप कापुरे, बँकेचे स्टाफ गोपीचंद घोरपडे, माऊली सुरवसे, विश्वनाथ जाधव, राजू वाघमारे, सचिन सरवदे, देवराव सूर्यवंशी व अनेक नागरिक उपस्थित होते.